शहरं
Join us  
Trending Stories
1
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
2
'Welcome my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
3
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
4
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
5
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
6
गश्मीर महाजनी 'देऊळ बंद २'मध्ये दिसणार? मोहन जोशींना म्हणाला, "स्वामींनी आदेश दिलाय तर..."
7
Vastu Shastra: बाथरूममध्ये बादली रिकामी ठेवताय? घरात दारिद्र्य आणणाऱ्या 'या' ३ चुका आजच सुधारा
8
कागोशिमा भूकंपाने जपान पुन्हा हादरले; ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे हादरे, प्रशासनाने जारी केला महत्त्वाचा अलर्ट!
9
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
10
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
11
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
12
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
13
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
14
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
15
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
16
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
17
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
18
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
19
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
20
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
Daily Top 2Weekly Top 5

Raj Thackeray : "मुख्यमंत्री माझ्या घरातील करावा, हा विचार नाही"; राज ठाकरे स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2024 15:22 IST

मनसेला ''एकहाती सत्ता देऊन राज्याचा विकास घडवावा,'' असे आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले.

पुणे : राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी केलेल्या भ्रष्टाचाराकडे दुर्लक्ष व्हावे, यासाठी जातीयवादाची पेरणी करून नागरिकांना आपापसात लढविण्याचे काम केले जात आहे. त्यामुळेच पुण्यासह राज्याचा विकास खुंटला आहे आणि त्याचा विचका झाला आहे. त्यामुळेच मनसेला एकहाती सत्ता देऊन राज्याचा विकास घडवावा,'' असे आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. मला खुर्चीचा सोस नाही तसेच मुख्यमंत्री माझ्या घरातील करावा, हा विचारदेखील नाही.' असे स्पष्टीकरणही राज ठाकरे यांनी  दिले.

हडपसर विधानसभा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार साईनाथ बाबर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. नागरिकांना काय हवे, याचा विचार न करता आपल्याला काय हवे, हेच लक्षात ठेवून हडपसरमधील राजकारण्यांनी येथील विकास रोखला आहे, अशी टीका राज ठाकरे यांनी केली. हडपसर कोंढवा या गावांमधील जुन्या लोकांना आजही जुने हडपसर जुने कोंढवा हवेसे वाटते. त्यामुळे महापालिकेत ही गावे समाविष्ट का झाली, असा सवाल केला जात आहे. वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त आहेत. येथील राजकारण्यांनी केवळ जाती - जातींमध्ये द्वेष पसरविला आहे. चांगले दिवस आणणारे वातावरण नक्कीच नाही. राज्यालाही हे वातावरण घातक आहे, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

या परिसरात शाळांमध्ये सामान्यांना प्रवेश नाहीत, रुग्णालये नाहीत, महिलांना सुरक्षित वातावरण नाही, मुलींवर अत्याचार होत आहेत. मुंबईचा विचका होण्यास काही काळ गेला. मात्र, पुण्याचा विचका होण्यास वेळ लागला नाही. शहरांना आकार देताना लोकांचा विचार करणे गरजेचे आहे. सध्या विकासाच्या नावाखाली नव्या कंत्राटदारांना कामे देऊन त्यांच्याकडून केवळ टक्क्यांची वसुली केली जात असल्याचा घणाघात ठाकरे यांनी यावेळी केला.

सन २०१४मध्ये मनसेने राज्याचा विकास आराखडा तयार केला होता. यापूर्वी कोणत्याही पक्षाने एखाद्या राज्याचा विकास आराखडा तयार केला नव्हता. त्यामुळे माझ्या मनातील महाराष्ट्र घडवण्यासाठी एकहाती सत्ता द्या, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. शिवछत्रपती यांनी दिलेले वैभव परत मिळवण्यासाठी मनसेला निवडून द्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.  

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४PuneपुणेRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसेhadapsar-acहडपसर