शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
2
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
3
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
4
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
5
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
6
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
7
उन्हाळ्यात कलिंगड खाणं पडलं महागात! बक्सरमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांना विषबाधा; आरोग्य विभाग अलर्टव
8
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
9
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
10
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
11
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
12
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
13
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
14
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
15
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
16
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
17
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
18
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
19
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
20
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
Daily Top 2Weekly Top 5

छोटा राजन आणि माझा डीएनए एकच..

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2020 21:00 IST

गँगस्टर छोटा राजनच्या पुतणीने मागितली ५० लाखांची खंडणी

ठळक मुद्देहस्तकाला पकडले रंगेहाथ : गुन्हे शाखेची कामगिरी

पुणे : भारती विद्यापीठ पोलिसांकडील तक्रार मागे घ्यावी व दुसऱ्या पत्नीला घटस्फोट द्यावा, यासाठी खेडचे माजी उपसभापती यांना ५० लाख रुपयांची खंडणी छोट्या राजनची सख्खी पुतणी प्रियदर्शनी निकाळजे हिने मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यापैकी २५ लाख रुपयांची खंडणीची रक्कम घेण्यासाठी आलेला छोट्या राजनचा हस्तक धीरज साबळे याला खंडणीविरोधी पथकाने सापळा रचून अटक केली आहे. धीरज बाळासाहेब साबळे (वय २६, रा. धानोरे, ता. खेड), प्रियदर्शनी निकाळजे (रा. जांभूळकर नगर, वानवडी) आणि मंदार वाईकर (निधिषा सोसायटी, मार्केट यार्ड) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. 
याप्रकरणी खेडच्या माजी उपसभापती राजेश वसंतराव जवळेकर (वय ४८, रा़ भाग्यतारा सोसायटी, कात्रज) यांनी खंडणीविरोधी पथकाकडे फिर्याद दिली आहे.

धीरज साबळे याला पोलिसांनी शनिवारी न्यायालयात हजर केले. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी टी़ व्ही़ क्षीरसागर यांनी धीरज साबळे याला १६ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

छोटा राजन आणि माझा डीएनए एकच
  जवळेकर हे धीरज साबळेच्या सांगण्यानुसार प्रियदर्शनी निकाळजे यांना भेटायला गेले होते. तेव्हा प्रियदर्शनी निकाळजे हिने ‘छोटा राजनची मी सख्खी पुतणी आहे. आमचा डीएनए एकच आहे. जीव प्यारा असेल तर मी सांगितलेले ऐक. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातून फोन आला तर मी सांगितल्याशिवाय जायचे नाही. मी पैसे पोच झाल्यानंतरच अर्ज मागे घेईन,’ असा दम भरला. यानंतर तिने हाताखाली काम करणाºया एकाला गाडीतून पर्स आणण्यास सांगितले. त्यातून पिस्तुल काढून फिर्यादीवर रोखले. ‘माझे ऐकले नाही तर यातील दहाच्या दहा गोळ्या घालून ठार मारीन,’ अशी धमकी दिली.

धीरज साबळे हा पोलिसांचा मुलगा आहे. त्याचे वडील सध्या पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात कार्यरत आहेत. तर, मंगेश वाईकर हा छोटा राजनचा राइट हँड म्हणून ओळखला जातो. तो सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीच मारामारीचे तीन गुन्हे आहेत. प्रियदर्शनी निकाळजे हिच्याविरुद्ध पुण्यातील हा पहिलाच गुन्हा आहे. 
०००
अभिनेत्री आणि मॉडेल यांचीही होणार चौकशी
मराठी अभिनेत्रीने २०१५मध्ये फिर्यादी जवळेकर यांच्याशी नोंदणी पद्धतीने विवाह केला आहे़ त्यांनी त्याअगोदर तीन ते चार मराठी चित्रपटांत काम केले आहे, तर तिची बहीण मॉडेल म्हणून काम करते़ गेल्या ६ महिन्यांपासून ती मंदार वाईकर याच्याशी संपर्कात आली आहे. पतीने मर्सिडीस कार घेऊन दिली नाही; तसेच आता तिला घटस्फोट हवा असल्याने तिने प्रियदर्शनी निकाळजे हिच्याशी संपर्क साधला़ त्यामुळे आता या दोघीही अडचणीत आल्या असून पोलीस त्यांच्याकडे चौकशी करण्याची शक्यता आहे़

 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकCourtन्यायालय