शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रकांतदादांनी पुण्याच्या महापौरांना दिले शंभरपैकी शंभर मार्क तर 'पालकमंत्र्यां'ना केले 'नापास'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2020 19:24 IST

अजित पवार यांचा स्वभाव पाहता, कोरोना आपत्तीत त्यांनी खाड खाड निर्णय घेणे अपेक्षित होते पण तसे त्यांनी केले नाही..

ठळक मुद्देअर्थचक्र गतीमान करण्यासाठी मोदी सरकारने घेतले महत्त्वाचे निर्णय केंद्र सरकारची आतापर्यंत सुमारे ४२ कोटी गरजूंना ५३,२४८ कोटी रुपयांची मदत

पुणे : कोरोना आपत्तीत पुणे शहरात महापौर मुरलीधर मोहोळ यांनी चांगले काम केले आहे. त्यांच्या कामाला मी १०० पैकी १०० मार्क देतो असे सांगून पाटील यांनी, पालकमंत्री अजित पवार यांच्या कामावर नाराजी व्यक्त केली. पवार यांचा स्वभाव पाहता, कोरोना आपत्तीत त्यांनी खाड खाड निर्णय घेणे अपेक्षित होते पण तसे त्यांनी केले नसल्याचे मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केले.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने दुसऱ्या कार्यकाळाच्या पहिल्या वर्षात केलेल्या कामाची व कोरोना आपत्तीत केलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील बोलत होते. पाटील म्हणाले, कोरोनाच्या आपत्तीत देशामध्ये नरेंद्र मोदी यांनी योग्य वेळेत लॉकडाऊन जाहीर केले. अर्थव्यवस्था सावरण्यासाठी २०.९७ लाख कोटींचे पॅकेज दिले. महाराष्ट्र राज्याला १६०० कोटी केवळ मजुरांच्या योजनेसाठी दिले. पण महाराष्ट्र शासनाने काहीही केले नाही. केवळ रेल्वे तिकिटातील १५ टक्के रक्कम दिली. देशातील इतर राज्यांनी केंद्र सरकारचे पॅकेज येण्यापूर्वीच स्वत:चे कोरोना आपत्तीकरिता पॅकेज दिले, तसे महाराष्ट्र सरकारने अद्याप काहीच केलेले नाही. 

देशातील पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरे यांचे नाव आहे. यावर बोलताना पाटील यांनी हा सर्व्हे कोणी केला हे पाहावे लागेल असे सांगून, आमचे ज्या राज्यात सरकार आहे तेथे व केंद्रात आम्हीच क्रमांक एकवर असल्याचे म्हणाले. देशाची अर्थव्यवस्था पुन्हा उभी करून देश आत्मनिर्भर करण्यासाठी वीस लाख कोटी रुपयांचे पॅकेज मोदी सरकारने जाहीर केले. त्यामध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या मर्जीने शेतमाल विकण्याचे स्वातंत्र्य देण्यासाठीच्या कायदेशीर सुधारणेसह अनेक महत्त्वाच्या आर्थिक सुधारणाही जाहीर करण्यात आल्या. शेतकरी, लघू उद्योजक, पथारीवाले, छोटे व्यावसायिक अशा सर्व घटकांना मदतीचा हात देऊन अर्थचक्र गतीमान करण्यासाठी मोदी सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. या पॅकेजमुळे देश कोरोनाच्या आर्थिक संकटातून बाहेर पडेल असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला.कोरोनामुळे अर्थव्यवस्था ठप्प झाल्यामुळे झळ बसलेल्या दुर्बल घटकांना मदतीसाठी केंद्र सरकारने तातडीने १ लाख ७० हजार कोटींचे प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज जाहीर केले व त्याची प्रभावी अंमलबजावणी केली. आतापर्यंत सुमारे ४२ कोटी गरजूंना ५३,२४८ कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. कोट्यवधी लोकांना मोफत धान्य, शेतकऱ्यांना खात्यात थेट पैसे जमा करणे, गरीब कुटुंबांना मोफत गॅस सिलिंडर देणे, जनधन खाते असलेल्या महिलांना तसेच गरीब ज्येष्ठ नागरिक, विधवा व दिव्यांगांना थेट आर्थिक मदत करणे असे उपाय केंद्र सरकारने केले.       

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारchandrakant patilचंद्रकांत पाटीलMayorमहापौरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBJPभाजपा