डोक्यात सिमेंटचा गट्टू घातला; तीक्ष्ण शस्त्राने वार, पुण्यात एकमेकांकडे बघण्याच्या वादातून तरुणाचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 10:49 IST2026-05-06T10:48:12+5:302026-05-06T10:49:15+5:30

दोन दिवसांपूर्वी ४ अल्पवयीन मुले आणि तरुणामध्ये एकमेकांकडे बघण्यावरून वाद झाला होता, धनकवडीतील आंबेगाव पठार भागात ही घटना घडली

Cement block put on head; stabbed with sharp weapon, youth murdered in Pune over an argument over looking at each other | डोक्यात सिमेंटचा गट्टू घातला; तीक्ष्ण शस्त्राने वार, पुण्यात एकमेकांकडे बघण्याच्या वादातून तरुणाचा खून

डोक्यात सिमेंटचा गट्टू घातला; तीक्ष्ण शस्त्राने वार, पुण्यात एकमेकांकडे बघण्याच्या वादातून तरुणाचा खून

धनकवडी : एकमेकांकडे बघण्याच्या वादातून तरुणाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून, तसेच तीक्ष्ण शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची घटना धनकवडीतील आंबेगाव पठार भागात घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी चार अल्पवयीनांना ताब्यात घेतले आहे.

नयन सचिन जाधव (वय १८, रा. आंबेगाव पठार, धनकवडी), असे खून झालेल्याचे नाव आहे. याबाबत नयन याच्या आईने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ‘खून केल्याप्रकरणी चार अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले आहे. बालन्याय मंडळाच्या आदेशाने त्यांची रवानगी निरीक्षणगृहात करण्यात आली आहे’, अशी माहिती भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यातील गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक कैलास कोडग यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुले आणि नयन हे धनकवडीतील आंबेगाव पठार परिसरात राहायला आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांच्यात एकमेकांकडे बघण्यावरून वाद झाला होता. सोमवारी (४ मे) रात्री सव्वानऊच्या सुमारास नयन आंबेगाव पठार येथील निलगिरी चाैकात थांबला होता. त्यावेळी अल्पवयीनांनी त्याला शिवीगाळ केली. त्याच्या डाेक्यात सिमेंटचा गट्टू घातला. त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. गंभीर जखमी झालेल्या नयनला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पसार झालेल्या अल्पवयीनांना ताब्यत घेण्यात आले असून, पोलिस निरीक्षक कोडग तपास करत आहेत.

Web Title : पुणे: घूरने के विवाद में युवक की हत्या, नाबालिग गिरफ्तार।

Web Summary : पुणे के धनकवडी में घूरने के विवाद में 18 वर्षीय युवक की हत्या कर दी गई। पीड़ित पर सीमेंट ब्लॉक और तेज हथियारों से हमला किया गया। पुलिस ने अपराध के संबंध में चार नाबालिगों को गिरफ्तार किया; उन्हें बाल सुधार गृह भेजा गया।

Web Title : Pune: Teen killed over staring dispute; minors arrested.

Web Summary : In Pune's Dhankawadi, an 18-year-old was murdered after a staring dispute. The victim was attacked with a cement block and sharp weapons. Police have arrested four minors in connection with the crime; they are sent to juvenile detention.