गिरीष बापट यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया

By Admin | Updated: July 7, 2015 01:47 IST2015-07-07T01:47:25+5:302015-07-07T01:47:25+5:30

राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांच्यावर सोमवारी खासगी रुग्णालयात यशस्वी बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली.

Bypass surgery on Girish Bapat | गिरीष बापट यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया

गिरीष बापट यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया


पुणे : राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांच्यावर सोमवारी खासगी रुग्णालयात यशस्वी बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली. बापट यांच्या नियमित वैद्यकीय तपासणीत रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे त्यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
डॉ. रणजित जगताप यांनी बापट यांच्यावर बिटींग हार्ट तंत्राचा वापर करून शस्त्रक्रिया केली.
त्यांची प्रकृती मध्ये सुधारणा होत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. पुढील चार दिवस ते कोणालाही भेटणार नसल्याचे डॉक्टरांनी निवेदनात म्हटले आहे. रुग्णालया भोवती कार्यकर्त्यांनाही मज्जाव करणात आला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Bypass surgery on Girish Bapat