शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय नेत्यांच्या वरदहस्तातून थाटले व्यवसाय; नवीन महापालिका आयुक्त तरी अतिक्रमणे काढणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 10:33 IST

शहरात अनेक फळे, भाज्या व विविध वस्तू विक्री करणारे टेम्पो, हातगाड्या रस्त्याच्या कडेला थांबून व्यवसाय करतात, यामुळे शहरात वाहतूककोंडी होते.

पुणे: शहरातील लहान-मोठ्या रस्त्यांवर, पदपथांवर झालेल्या अतिक्रमणांवर प्रभावी कारवाई होण्यासाठी तत्कालीन महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी दोनवेळा अतिक्रमण विभागाचे प्रमुख बदलले, अतिक्रमण निरीक्षकांसह उपनिरीक्षकांच्या बदल्या केल्या. मात्र परिस्थिती ‘जैसे थे’ अशीच राहिली. आता महापालिकेला नवलकिशोर राम हे नवीन आयुक्त मिळाले आहेत. आता नवीन आयुक्त तरी हे चित्र बदलून शहर अतिक्रमणमुक्त करणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.

शहरातील फेरीवाले आणि पथारी व्यावसायिकांना महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून वार्षिक शुल्क आकारून फेरीवाला प्रमाणपत्र दिले जाते. मात्र, महापालिकेकडून कसलाही परवाना न घेता, राजकीय नेत्यांच्या वरदहस्तातून शहरातील पदपथ व रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे करून व्यवसाय थाटण्यात आलेली आहेत. यातून शहरात प्रवेश करणारे रस्तेही सुटलेले नाहीत. शहरात येणाऱ्या रस्त्यांना पदपथ असतानाही फळे, भाज्या व विविध वस्तू विक्री करणारे टेम्पो, हातगाड्या रस्त्याच्या कडेला थांबून व्यवसाय करतात. वाहनचालक व दुचाकीस्वार रस्त्यावरच आपल्या गाड्या थांबवून अशा व्यावसायिकांकडे खरेदी करतात. यामुळे शहरात येणाऱ्या रस्त्यावर वाहतूककोंडी होते.

रस्ते आणि पदपथांवरील अतिक्रमणांवर प्रभावी कारवाई करण्याच्या सूचना केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिल्यानंतर काही दिवस कारवाईचा दिखावा झाला. त्यानंतर काही दिवसांतच कारवाई थंड होऊन अतिक्रमणे ‘जैसे थे’ झाली. तत्कालीन महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी अतिक्रमणांवर प्रभावी कारवाई व्हावी, अधिकारी व व्यावसायिकांच्या संगनमताची साखळी तुटावी, यासाठी दोनवेळा अतिक्रमण विभागाचे प्रमुख बदलले, अतिक्रमण निरीक्षकांसह उपनिरीक्षकांच्या बदल्या केल्या, मात्र परिस्थिती ‘जैसे थे’च राहिली. आता महापालिकेचे नवीन आयुक्त नवलकिशोर राम हे तरी शहर अतिक्रमणमुक्त करणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाMONEYपैसाcommissionerआयुक्तPoliticsराजकारण