शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

प्लॅस्टिकच्या बाटल्यांपासून बनवला एक बंगला न्यारा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2020 23:30 IST

तब्बल ६० हजारहून अधिक रिकाम्या प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर

ठळक मुद्देदोन मजली घर साकारले ; खर्चही होतो कमी, घेरा सिंहगड येथे उपक्रम   तळजाईवर बाटल्यांपासून बसण्यासाठी बाकडे 

श्रीकिशन काळे पुणे : सध्या बाटली बंद पाण्याच्या बाटल्यांचा कचरा अनेक ठिकाणी दिसून येतो. परंतु, याच कचºयापासून टुमदार घर बनविण्याची किमया एका पुणेकराने केली आहे. तब्बल ६० हजारहून अधिक रिकाम्या प्लास्टिकच्या बाटल्यांपासून दोन मजली घर साकारले आहे. घेरा सिंहगड या परिसरात हे घर असून, बाटल्यांचा अतिशय चांगल्या पध्दतीने वापर करून एक बंगला बना न्याराचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविले आहे. वास्तूविशारद राजेंद्र इनामदार यांनी हे घर उभा केले आहे. प्लास्टिकचा कचरा जिरवणे कठिण काम बनले आहे. त्यामुळे त्यावर इतर उपाय शोधणे किंवा त्याचा पुनर्वापर करणे योग्य ठरणारे आहे. या उपक्रमातंर्गत इनामदार यांनी हजारो बाटल्यांचा पुनर्वापर करून ते इतरत्र कुठेही कचरा म्हणून पडण्यापासून वाचविल्या आहे. गेल्या तीन वर्षांपासून हे घर उभे करण्यात येत आहे. कारण बाटल्या संकलित करणे, त्यामध्ये क्रश, वाळू, सिमेंट भरणे याला खूप वेळ लागतो. परंतु, बाटल्यांमध्ये सिमेंट, वाळू भरल्यावर ते वीटेसारखेच टणक बनते.  

या उपक्रमाविषयी इनामदार म्हणाले, मला श्वानांसाठी घर बांधायचे होते. एका दिवशी रात्री डोक्यात रिकाम्या प्लास्टिकच्या बाटल्यांपासून घर बांधायची कल्पना सुचली. त्यानंतर मी इंटरनेटवर असा प्रयोग कोणी केला आहे का ? ते पाहिले. तेव्हा जगभरात असे प्रयोग झाले आहेत. पण आपल्या इथे मात्र कोणी केलेले दिसले नाही. म्हणून मी त्यासाठी प्रयत्न सुरू केले. सुरवातीला किल्ले सिंहगड परिसरातील प्लास्टिक बाटल्या संकलित केल्या. त्यानंतर हॉटेलमध्येही रिकाम्या बाटल्या असतात, त्या जमा केल्या. त्यामध्ये कामगार लावून सिमेंट, वाळू, क्रश भरले. तीन वर्षांनंतर आता हे घर तयार झाले असून, एका महिन्यात संपूर्ण काम होईल.’’  पर्यावरणासाठी अत्यंत घातक ठरणाºया प्लास्टिकच्या बाटल्यांपासून घर उभारून काही प्रमाणात कचºयाचा पुनर्वापर केला आहे. परंतु, प्रत्येकाने जर अशा प्रकारे वस्तूंचा पुनर्वापर केला तर कचºयामुळे वातावरण प्रदूषित होणार नाही, असे आवाहन इनामदार यांनी केले आहे. एक बाटलीचा खर्च साडेतीन रूपये एका वीटेची किंमत सुमारे सात रूपयांना पडते. पण एक बाटली भरायला साडेतीन रूपये खर्च येतो. त्यामुळे खर्च कमी आहे. एक वीटेला जेवढी जागा लागते, त्याला दीड बाटली लागते. त्यामुळे विटेचा आणि या बाटलीचा खर्च जवळपास एकच होतो. पण बाटल्यांचा कचरा वातावरणात राहण्यापेक्षा एकाच ठिकाणी त्याचा उपयोग होतो, म्हणून हा उपक्रम राबविला.   तळजाईवर बाटल्यांपासून बसण्यासाठी बाकडे  दोन-तीन वर्षांपूर्वी प्लास्टिकच्या बाटल्यांचा पुनर्वापर करण्याचा छोटासा उपक्रम टेल्स ऑर्गनायझेशनचे लोकेश बापट यांनी काही वर्षांपूर्वी तळजाई टेकडीवर केला होता. त्या ठिकाणी बसण्यासाठी सुमारे पन्नास प्लास्टिकच्या बाटल्यांपासून बाकडे तयार केली होती. ती बाकडे आजही चांगल्या अवस्थेत आहेत.  

टॅग्स :PuneपुणेPlastic banप्लॅस्टिक बंदीHomeघर