दोघेही दारूच्या नशेत; वडिलांना पेटवून देऊन केला खून, पुण्याच्या दांडेकर पुलावरील धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 10:47 IST2026-02-12T10:47:35+5:302026-02-12T10:47:59+5:30

दारूच्या नशेत असताना दोघांमध्ये भांडणे झाली. त्यावेळी रागाच्या भरात मुलाने वडिलांच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले

Both were drunk; Father was set on fire and murdered, shocking incident on Dandekar Bridge in Pune | दोघेही दारूच्या नशेत; वडिलांना पेटवून देऊन केला खून, पुण्याच्या दांडेकर पुलावरील धक्कादायक प्रकार

दोघेही दारूच्या नशेत; वडिलांना पेटवून देऊन केला खून, पुण्याच्या दांडेकर पुलावरील धक्कादायक प्रकार

पुणे : दारूच्या नशेत मुलाने वडिलांचा पेटवून देऊन खून केल्याचा प्रकार नुकताच दांडेकर पूल परिसरात घडला. यासंदर्भात पर्वती पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रवींद्र उद्धव भालेराव (६१, रा. सर्व्हे क्र. १३० दांडेकर पूल) असे मृताचे नाव आहे. त्यांचा खून केल्याच्या आरोपावरून त्यांचा मुलगा सागर (२८) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भालेराव सुतारकाम करून उदरनिर्वाह करत असत. मुलगा सागर हाही छोटी मोठी कामे करतो. दोघांनाही दारूचे व्यसन होते. दारूच्या नशेत असताना शनिवारी (दि. ७) दोघांमध्ये भांडणे झाली. त्यावेळी रागाच्या भरात सागरने वडिलांच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. या घटनेत भालेराव गंभीररीत्या भाजले. आग भडकल्याने सागरने आग आटोक्यात आणून त्यांना ससून रुग्णालयात दाखल केले. ते पन्नास टक्के भाजले असल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले. तेथे उपचार सुरू असताना मंगळवारी (दि. ११) मध्यरात्री भालेराव मरण पावले. या प्रकरणी पर्वती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलिस निरीक्षक सुभाष महाले पुढील तपास करत आहेत.

Web Title : पुणे: नशे में बेटे ने पिता को जलाकर मार डाला

Web Summary : पुणे में, एक नशे में धुत बेटे ने बहस के बाद अपने पिता को जलाकर मार डाला। पीड़ित, रवींद्र भालेराव ने अस्पताल में दम तोड़ दिया। पुलिस ने बेटे सागर को गिरफ्तार कर लिया है और मामले की जांच कर रही है।

Web Title : Pune: Drunk Son Kills Father by Setting Him on Fire

Web Summary : In Pune, a drunk son fatally set his father on fire after an argument. The victim, Ravindra Bhalerao, succumbed to his injuries in the hospital. Police have arrested the son, Sagar, and are investigating the case.