शहरं
Join us  
Trending Stories
1
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
2
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
3
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
4
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
5
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
6
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
7
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
8
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
9
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
10
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
11
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
12
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
13
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
14
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
15
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
16
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
17
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
18
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
19
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या पासधारकांची बोगीत झुंडशाही

By admin | Updated: July 4, 2014 06:33 IST

मुंबई-पुणे प्रवासाचा नवीन मासिक पास काढून सिझन तिकीटधारकांच्या डब्यातून प्रवास करण्याच्या विचारात असाल तर थांबा...

दीपक जाधव, पुणेमुंबई-पुणे प्रवासाचा नवीन मासिक पास काढून सिझन तिकीटधारकांच्या डब्यातून प्रवास करण्याच्या विचारात असाल तर थांबा...! ‘इंटरसिटी एक्स्प्रेस’चा संपूर्ण डबाच जुन्या पासधारकांनी ताब्यात घेतला असून, त्या डब्यात नवीन पासधारकांना मज्जाव करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीमध्ये आढळून आला. त्यांच्या ‘दादागिरीपुढे’ रेल्वे प्रशासनही हतबल झाल्याचे दिसून आले.‘इंटरसिटी एक्स्प्रेस’मधून प्रवास करणाऱ्या नवीन पासधारकांना त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी ‘लोकमत’कडे आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर मुंबई ते पुणे असा इंटरसिटी एक्स्प्रेसने प्रवास केला असता हा अचंबित करणारा प्रकार निदर्शनास आला. सकाळी सात वाजता दादर स्थानकावरून इंटरसिटी एक्स्प्रेसच्या डब्यात प्रवेश केला. त्या वेळी डबा रिकामाच होता. काही पासधारक डब्यात चढले, त्यांनी त्यांच्या नेहमीच्या जागा पकडल्या. एकेका पासधारकाने सीटवर बॅगा ठेवून दोन्ही सीट ताब्यात घेतले. तिथे बसण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी बसू दिले नाही. एका रिकाम्या सीटवर जाऊन बसलो. डबा रिकामा असूनही काही जण सीटवर न बसता पॅसेजमधील मोकळ्या जागेत खाली बसले. याचे थोडे आश्चर्य वाटले; मात्र त्याचे कारण थोड्या वेळातच समजले. ठाण्याला पासधारकांचा मोठा लोंढा डब्यामध्ये चढला अन् डब्यामध्ये मोठी गर्दी झाली. एक तरुण व त्याच्या सोबतचे आणखी ४-५ जण आमच्या जवळ आले. ही जागा आमची असून इथून उठा, असे त्यांनी नवीन पासधारकांना सांगितले. उठण्यास नकार दिला असता ते आमच्या अंगावरच धावून आले. त्यांच्या मदतीला डब्यातील इतर जुने पासधारकही आले. आरडाओरडा करीत त्यांनी आम्हांला तेथून उठविले.सिझन तिकीटधारकांच्या डब्याकडे न फिरकणाऱ्या टीसीकडे जाऊन त्याला संबंधित बोगीमध्ये घेऊन आलो. आम्हांला जागेवरून उठविणाऱ्या प्रवाशाकडे टीसीने विचारणा केली असता त्या वेळीही त्या टीसीवरही सर्व जुने पासधारक तुटून पडले. त्यांनी शिवीगाळही करण्यास सुरुवात केली. त्यांचा रूद्र अवतार पाहून टीसीने तेथून पळ काढला. आमच्याप्रमाणे बोगीत उभे राहून प्रवास करणाऱ्याने हे नेहमीचेच असल्याचे सांगितले. रेल्वे पोलिसांकडे तक्रारी केल्या तरी उपयोग होत नाही. बोगीत सीट रिकाम्या असल्या तरी ते नवीन लोकांना बसू न देता आरामात पत्ते खेळत बसतात. त्यांच्या झुंडशाहीपुढे कोणाचेच चालत नसल्याने अनेक पासधारकांना दररोज उभे राहूनच प्रवास करावा लागत असल्याच्या व्यथा त्यांनी मांडल्या.(प्रतिनिधी)