शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याची भाजपाची खेळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क इंदापूर : दिल्लीतील भाजपचे सरकार ईडी व सीबीआय या यंत्रणेचा प्रचंड दुरुपयोग करून राज्यातील महाविकास आघाडी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

इंदापूर : दिल्लीतील भाजपचे सरकार ईडी व सीबीआय या यंत्रणेचा प्रचंड दुरुपयोग करून राज्यातील महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचा डाव करत आहे. परंतु, राज्यामध्ये भाजपा सत्तेत असताना, ज्या मंत्र्यांवर आरोप झाले, त्यांच्यावर कारवाई केली नाही. सुडाचा बदला घेण्याची भावना महाराष्ट्रात कधी नव्हती. अशी चुकीची परंपरा घातक ठरणारी आहे, अशी टीका राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली.

इंदापूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामधाम येथे मंगळवारी (दि. ३१) आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार बोलत होते. या वेळी इंदापूर तालुक्याचे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष स्वप्नील सावंत व काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

वडेट्टीवार म्हणाले, सध्या भारतीय जनता पार्टी दबाव तंत्राचा वापर करून, दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. दिल्लीतले सरकार शेतकऱ्यांना न्याय देऊ शकत नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून न्याय मिळावा म्हणून शेतकरी झगडत आहेत. मात्र केंद्र सरकार अद्यापि शेतकऱ्यांना न्याय देऊ शकले नाही. उलट न्याय मागणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करण्याचा प्रचंड प्रयत्न केंद्र सरकार करत आहे. भाजपाचे सरकार म्हणजे व्यापाऱ्यांचे सरकार आहे. देश विकण्याचा धंदा केंद्र सरकारने चालवला आहे, असा घणाघात वडेट्टीवार यांनी केला. आमचे विरोधक मागील काही दिवसांत आशीर्वाद घेण्याच्या नावाखाली फिरले. परंतु हा आशीर्वाद घेण्याअगोदर पेट्रोल डिझेलचे भाव कमी केले नाहीत, असा सवाल या वेळी करत, आम्ही ओबीसींना, भटक्यांना न्याय देण्याची भूमिका काँग्रेसच्या माध्यमातून कायमची ठेवली आहे. ओबीसी समाज मोठ्या प्रमाणात राज्यात व देशात आहे. त्यांचा सातत्याने सुधारात्मक विचार करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे, अशीही अपेक्षा राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री वडेट्टीवार यांनी व्यक्त केली.

चौकट :

इंदापूरची विधानसभेची जागा आम्ही सोडणार नाही

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आमच्या पक्षाची भूमिका ठरलेली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व आमचे सर्व सहकारी काँग्रेस पक्षाची ताकद तळागाळापर्यंत वाढवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेत आहेत. त्यामुळे आम्ही काही इंदापूरची विधानसभा सोडणार नाही. सध्या राज्यात काँग्रेस पक्षालाच जोरदार पाठिंबा मिळतो आहे. पुढच्या विधानसभेला महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष नंबर एक राहील, अशीही माहिती मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

फोटो ओळ : इंदापूर येथे पत्रकार परिषदेत बोलताना राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार व मान्यवर.