शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

बीजेपीला वाटतेय राहुल गांधींची भीती

By admin | Updated: September 27, 2015 00:42 IST

केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारला राहूल गांधी यांची भीती वाटते आहे, त्यामुळे राहूल काही बोलले तर लगेच अनेक केंद्रीय मंत्री त्यांचा प्रतिवाद करायला धावतात

पुणे : केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारला राहूल गांधी यांची भीती वाटते आहे, त्यामुळे राहूल काही बोलले तर लगेच अनेक केंद्रीय मंत्री त्यांचा प्रतिवाद करायला धावतात. १६ महिने झाले, केंद्र सरकारने दाखवलेल्या सर्व स्वप्नांचा फुगा आता फुटला आहे, त्यामुळेच पंतप्रधान मोदी सतत देशाबाहेर राहतात अशी टीका माजी केंद्रीय व्यापार मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी शनिवारी पुण्यात केली.एका कार्यक्रमानंतर शर्मा यांनी पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप सरकारवर हल्ला चढवताना ते म्हणाले, ‘‘ जनतेला स्वप्नांचे गाजर दाखवत त्या लाटेवर निवडून आलेल्या मोदी सरकारला गेल्या १६ महिन्यात काहीही करून दाखवता आले नाही. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहूल यांच्यावर ते सतत टिका करतात, याचे कारण त्यांना त्यांची भिती वाटते हेच आहे. राहूल चांगले काम करीत असून त्यांच्या प्रयत्नांमुळेच भूसंपादन कायद्याच्या प्रश्नावर भाजप सरकारला गुडघे टेकणे भाग पडले.’’पेट्रोलचा आंतरराष्ट्रीय व्यापार कोसळत आहे, त्याचा मोठा फायदा भारताला होत आहे, मात्र हा फायदा जनतेपर्यंत पोहचत नाही. त्याचे काय होते याची चौकशी झाली पाहिजे. पंतप्रधान संसदेत अधिवेशनाला उपस्थित रहात नाहीत, माध्यमांबरोबर बोलत नाहीत, सतत परदेशात असतात. तिथे त्यांच्या मोठमोठ्या सभा होतात. या सभेचे खर्च कोण करीत आहे असा सवाल शर्मा यांनी उपस्थित केला. १६ महिन्यात त्यांचे २९ परदेश दौरे झाले, आताही ते अमेरिकेत आहेत, आणखी काही दिवसांनी ते फ्रान्सला चालले आहेत. परदेश दौऱ्यांचा त्यांना विक्रम करायचा असावा अशी टिका शर्मा यांनी केली.राहूल गांधी काँग्रेसच्या उपाध्यक्ष पदावर निवडून आले आहेत, त्यांची निवड झालेली नाही. योग्य वेळ येताच ते अध्यक्षपदही स्विकारतील. सध्या काँग्रेसजवळ सोनिया गांधींसारख्या आदर्श अध्यक्ष आहेत. तरीही माध्यमांकडून राहूल गांधी यांच्याबाबत प्रश्न केले जातात. मात्र बीजेपीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह त्या पदापर्यंत कसे पोहचले? त्यांच्या भूतकाळाविषयी सर्व माहिती असूनही त्याबद्धल मात्र काहीही विचारले जात नाही, असे मत शर्मा यांनी व्यक्त केले. काँग्रेसच्या अखिल भारतीय समितीचे सदस्य गोपाळ तिवारी, कॉँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष अभय छाजेड, पिंपरी- चिंचवड शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर उपस्थित होते. (प्रतिनिधी)