शहरं
Join us  
Trending Stories
1
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
2
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
3
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
4
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
5
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
7
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
8
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
9
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
10
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
11
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
12
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
13
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
14
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
15
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
16
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
17
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
18
मॅरिड बॉयफ्रेंडसाठी सेल्स गर्लने १.६६ कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, पण आंघोळीला गेली अन् घात झाला
19
Sanjay Raut: "लोक भाजपला मतदान करून आपल्या कर्माची फळं भोगतायत!" संजय राऊत असं का म्हणाले?
20
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गम भागासाठी दुचाकी रुग्णवाहिका; पुण्यात हस्तांतरण समारंभ; आदिवासींना होणार मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 13:30 IST

सामाजिक भान ठेवून आणि आरोग्यविषयक गरज लक्षात घेऊन रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे ही कौतुकास्पद बाब आहे, असे मत सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम यांनी व्यक्त केले. 

ठळक मुद्देरोटरी क्लब आॅफ पुणे वेस्टएंड, आदर्श मित्र मंडळ आणि पुणे पोलीस यांचा पुढाकारतत्काळ आरोग्यसेवा मिळावी, यासाठी दुचाकी रुग्णवाहिकेची सुविधा : उदय जगताप

पुणे : गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात रस्ते, शिक्षण, आरोग्य यांसारख्या जीवनावश्यक सुविधादेखील उपलब्ध नाहीत. सामाजिक भान ठेवून आणि आरोग्यविषयक गरज लक्षात घेऊन रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे ही कौतुकास्पद बाब आहे. समाजातील इतरांनीदेखील अशा दुर्गम भागात प्रत्यक्ष जाऊन तेथील समस्या समजून घेण्याचा प्रयत्न करावा, असे मत सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम यांनी व्यक्त केले. 
रोटरी क्लब आॅफ पुणे वेस्टएंड, आदर्श मित्र मंडळ आणि पुणे पोलीस यांच्यातर्फे अतिदुर्गम भागात आरोग्य सेवा मिळावी, यासाठी दुचाकी रुग्णवाहिका हस्तांतर समारंभाचे आयोजन स्वारगेट येथे करण्यात आले होते. या वेळी रोटरी क्लब आॅफ पुणे वेस्टएंड चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आदित्य देवधर, रोटरी क्लब आॅफ पुणे वेस्टएंड चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी, आदर्श मित्र मंडळचे कार्यकर्ते, परिमंडळ दोनचे उपायुक्त प्रवीण मुंढे, सहायक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार, अ‍ॅड. प्रताप परदेशी, सामाजिक कार्यकर्ते उदय जगताप, दुचाकी रुग्णवाहिका बनविणारे सुदर्शन डोईफोडे, नितीन करंदीकर, उदय कुलकर्णी, महेश झुरळे उपस्थित होते. 

दुर्लक्षित भाग 
रवींद्र कदम म्हणाले, ‘गडचिरोली जिल्ह्यात अनेक संसाधने उपलब्ध असतानादेखील प्रस्थापित व्यवस्थेचे दुर्लक्ष झाल्यामुळे हा भाग अजूनही दुर्लक्षित आहे. तेथील स्थानिक जनता वेगवेगळ्या दुष्टचक्रात अडकलेली आहे. त्यांच्या या दैनंदिन जीवनासाठी आवश्यक सोयी-सुविधांसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.’ 

गडचिरोलीमधील एका गावात रुग्णवाहिका न मिळाल्याने एका वडिलांनी स्वत:च्या मुलाचा मृतदेह खांद्यावर घेऊन पाच किलोमीटर चालत घरी आणला. ही घटना लक्षात घेऊन अशा घटना भविष्यात होऊ नयेत आणि तत्काळ आरोग्यसेवा मिळावी, यासाठी दुचाकी रुग्णवाहिकेची सुविधा पुण्यातून उपलब्ध करून दिली आहे.    
- उदय जगताप

टॅग्स :Puneपुणे