शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित

By संतोष कनमुसे | Updated: November 6, 2025 14:20 IST

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या 'अमीडिया होल्डिंग्स एलएलपी' या कंपनीच्या जमीन खरेदीच्या व्यवहाराने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूंकप झाला. या प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या 'अमीडिया होल्डिंग्स एलएलपी' या कंपनीच्या जमीन खरेदीच्या व्यवहार प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली आहे.  शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते अंबादास दानवे यांनी या व्यवहारात गंभीर अनियमितता असल्याचा आणि १८०४ कोटी बाजारभाव असलेली जमीन केवळ ३०० कोटींना विकत घेतल्याचा आरोप केला आहे.दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची दखल घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात आता प्रशासन अॅक्शनमोडवर आले असून तहसीलदार सूर्यकांत येवले याचे निलंबन करण्यात आले आहे.

पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'

या प्रकरणी अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली आहे. पुणे तहसीलदार सुर्यकांत येवले यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात व्यवस्थेतील बडे अधिकारी दोषी आढळल्याचे समोर आले आहे. आणखी काही अधिकाऱ्यांचा या प्रकरणात समावेश आहे का याची चौकशी सुरू आहे. आणखी काही अधिकाऱ्यांवर कारवाई होऊ शकतो. या प्रकरणात अनेक बडे अधिकारी सक्रिय होते अशी माहिती समोर आली आहे.  विरोधी पक्षांकडून गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे चौकशीचे आदेश

"या प्रकरणाच्या संदर्भात सगळी माहिती मी मागवली आहे. महसूल विभाग, आयजीआर, लँड रेकॉर्ड असतील या संदर्भातील सगळी माहिती मागवली आहे. याप्रकरणी योग्य ते चौकशीचे आदेश दिलेले आहेत. ही सगळी माहिती आणि प्राथमिक चौकशीच्या आधारावर आहे. जे सांगायचे ते सांगणार आहे. माझ्याकडे अद्याप पूर्ण माहिती आलेली नाही. जे मुद्दे समोर आलेत ते गंभीर आहेत त्यामुळे त्याची योग्य प्रकारे माहिती घेऊनच बोललं पाहिजे. त्या दृष्टीने ही माहिती आज माझ्याकडे येणार आहे," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

तक्रार आल्यावर कारवाई सुरू करणार - चंद्रशेखर बावनकुळे

या प्रकरणी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली.  "आतापर्यंत माझ्याकडे कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाही,  दमानियांचा फोन मला होता . मंगळवारी ते तक्रार फाईल करणार आहेत. उद्योग विभाग तपासेल कोणत्या योजनेतंदर्भात काय दिलंय.आम्ही आयटी पार्कचे धोरण आले तेव्हा कॅबिनेटने काही सवलती जाहीर केल्या होत्या.  त्यातील त्या आहेत का? हे तपासावे लागेल, असंही बावनकुळे म्हणाले.  मी यासंदर्भात तक्रार आणल्यानंतर आम्ही तपास करु. अधिकाऱ्यांनी काही गडबड केली असेल तर आम्ही तपास करु, असंही बावनकुळे म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Tehsildar Suspended in Parth Pawar Land Deal Case Amidst Allegations

Web Summary : Tehsildar Suryakant Yewale suspended amid Parth Pawar land deal probe. Ambadas Danve alleges irregularities, claiming undervalued land sale. CM Fadnavis ordered investigation; committee formed. More officials may face action as opposition demands charges.
टॅग्स :parth pawarपार्थ पवारAjit Pawarअजित पवारPuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस