शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या आमिषाने तरुणांची फसवणूक, जोडप्याला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 04:58 IST

लग्नाचे आमिष दाखवून तरुणांना भावनिकदृष्ट्या गुंतवून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळून फसवणूक करणाºया नागपूरच्या जोडप्याला पुणे सायबर क्राइमने अटक केली आहे़

पुणे : लग्नाचे आमिष दाखवून तरुणांना भावनिकदृष्ट्या गुंतवून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळून फसवणूक करणाºया नागपूरच्या जोडप्याला पुणे सायबर क्राइमने अटक केली आहे़किशोर चुडामन रामटेककर (वय ३४) आणि त्याची पत्नी रिंकी ऊर्फ कामिनी किशोर रामटेककर (वय २८, रा़ विद्यानगर, वाठोडी, नागपूर) अशी त्यांची नावे आहेत़ मेट्रोमोनी साइटवरील प्रोफाइलवरून लग्नाची मागणी आल्यावर, त्यामध्ये सुंदर फोटो व चांगल्या नोकरीचे आमिष दाखविले जाते. मोबाईलवर चॅटिंग करून भावनिक गुंतवणूक करून एखादी घटना घडलेली आहे, असे भासवून वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये वेगवेगळ्या कारणास्तव मोठ्या रकमा भरण्यास भाग पाडले जात होते. रामटेककर याने पत्नीचे काव्या असलकर, पल्लवी असलकर या नावाने मेट्रोमोनी साइटवर नाव नोंदवून ठेवले होते़सिंहगड रोड येथील ३१ वर्षांचा आयटी इंजिनिअरचा घटस्फोट झाला होता़ त्याने पुनर्विवाहासाठी एका मेट्रोमोनीवर नाव नोंदविले होते़ त्याला पल्लवी असलकरनने संपर्क साधला़ दोघांचे चॅटिंग चालू झाले होते़ तिने वडिलांना हार्ट अ‍ॅटॅक आल्याने पैशाची गरज असल्याचे सांगून या तरुणाकडे २ लाख १५ हजार रुपयांची मागणी केली़ त्याप्रमाणे या तरुणाने बँकेत पैसे भरले़ नंतर या तरुणीचा फोन बंद झाला़ झारखंडला जाऊन चौकशी केल्यावर, अशी कोणी तरुणी येथे काम करीत नसल्याचे सांगितले़रिंकी एका बँकेत कामाला होती़ सध्या काही करीत नाही, तर किशोर रामटेककर बँकेत क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डचे काम करीत होता़ त्यांना कर्ज झाल्याने गेल्या काही महिन्यांपासून ते अशा प्रकारे फसवणूक करीत होते़सांगवी येथे राहणाºया ३२ वर्षांच्या तरुणाची २ लाख रुपयांची फसवणूक झाली होती़ त्यामधील मुलीचे नाव काव्या असलकर होते़ तिचा मोबाईल नंबर राजस्थानमधील होता़ पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहायक पोलीस आयुक्त मिलिंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक गजानन पवार, सहायक निरीक्षक स्वप्नाली शिंदे, हवालदार अस्लम आत्तार, सरिता वेताळ व त्यांच्या सहकाºयांनी गुन्ह्यात वापरलेल्या मोबाईल डाटाच्या माहितीचे पृथ:करण करून त्यांचा ठावठिकाणा शोधला.

टॅग्स :PuneपुणेCrimeगुन्हा