शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
2
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
3
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
4
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
5
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
6
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
7
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
8
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
9
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
10
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
11
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
12
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
13
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
14
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
15
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
16
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
17
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
18
PAK vs BAN : गडबड घोटाळा! पाकिस्तानच्या संघात भारतीयांचा भरणा; रोहित शर्माचं नाव कॅप्टनच्या रुपात झळकलं
19
IPL 2026: सूर्यकुमार खेळणार की नाही? हार्दिकच्या फिटनेसचं काय? MIचा कॅप्टन कोण? पाहा अपडेट
20
'महाभारत' मालिकेत रूपा गांगुली यांनी नेसली होती २५० मीटर लांबीची साडी, या कंपनीनं केली होती तयार; किती होती किंमत? 
Daily Top 2Weekly Top 5

ब्युटीपार्लर चालक तरुणीचा गळा दाबून खून; मृतदेह रस्त्याच्या कडेला टाकून आरोपी पसार, पुण्यातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 12:17 IST

ब्युटीपार्लर चालक तरुणी महिला ग्राहकाकडे कामाला गेली होती. त्यानंतर तिचा मृतदेह मुंढव्यातील केशवनगर परिसरातील कचरा डेपोजवळ असलेल्या रस्त्यावर सापडला

पुणे : ब्युटी पार्लरमध्ये काम करणाऱ्या तरुणीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. तरुणीचा मृतदेह रस्त्याच्या कडेला टाकून आरोपी पसार झाला. या प्रकरणी मुंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आफरीन सलीम पठाण (वय २९, सध्या रा. वडगाव शेरी) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे.

याबाबत आफरीनची लहान बहीण अरबिना सय्यद (वय २४, सध्या रा. वडगाव शेरी, मूळ रा. खुडुसवाडा, चिंचघर, जि. पालघर) हिने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आफरीन हिचा ब्युटी पार्लरचा व्यवसाय आहे. महिला ग्राहकांनी तिच्याशी संपर्क साधल्यानंतर ती घरी जाऊन ब्युटी पार्लरविषयक कामे करत असे. मंगळवारी (दि. ५) सायंकाळी ती एका महिला ग्राहकाकडे कामाला गेली होती. त्यानंतर तिचा मृतदेह मुंढव्यातील केशवनगर परिसरातील कचरा डेपोजवळ असलेल्या रस्त्यावर सापडला. नागरिकांनी याबाबतची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. सुरुवातीला पोलिसांना अपघाताची घटना वाडली. वाहनाने तिला धडक दिल्यानंतर तिचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.

त्यानंतर तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला. शवविच्छेदन अहवालात तरुणीचा गळा दाबून खून केल्याचे उघडकीस आले. पाेलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. केशवनगर कचरा डेपोजवळ असलेल्या रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सागर गोडे करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune: Beautician strangled to death, body dumped; accused absconding.

Web Summary : A beautician in Pune was found murdered, strangled, and her body dumped near a garbage depot in Keshavnagar. Police are investigating after finding no CCTV and the accused is absconding.
टॅग्स :Pune Crimeपुणे क्राईम बातम्याCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूArrestअटकMundhvaमुंढवाSocialसामाजिकWomenमहिला