शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

‘वरसगाव’ने गाठला तळ; लवासात बोटिंगची मौज

By admin | Updated: July 3, 2014 05:35 IST

पुणे शहर आणि परिसरात भीषण पाणीटंचाई निर्माण झालेली असताना वरसगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील लवासा येथील बंधाऱ्यात बोटिंगचा आनंद लुटला जात आहे.

पुणे : पुणे शहर आणि परिसरात भीषण पाणीटंचाई निर्माण झालेली असताना वरसगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील लवासा येथील बंधाऱ्यात बोटिंगचा आनंद लुटला जात आहे. लवासा प्रकल्पाची पाण्याची सोय व्हावी, यासाठी वरसगाव धरणात सध्या दोन बंधारे बांधण्यात आले आहेत. जुलै महिना उजाडला, तरी धरणपाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यापार्श्वभूमीवर ‘लोकमत’प्रतिनिधीने मंगळवारी पानशेत आणि वरसगाव धरणाची पाहणी केली. वरसगाव धरणाच्या मुख्य भिंतीलगतच लवासा प्रकल्पात जाण्यासाठी रस्ता आहे. सुमारे ३० किलोमीटर धरण पाणलोट क्षेत्रानंतर लवासाचा प्रकल्प येतो. दासवे येथे पहिला बंधारा आहे. या बंधाऱ्याची क्षमता ६५ दशलक्ष घनफूट इतकी आहे. या बंधाऱ्यातील ०.१५ दशलक्ष घनफूट पाणी धरणात सोडलेले आहे. या बंधाऱ्यातच बोटिंग केले जाते. या बंधाऱ्याच्या पुढे आणखी एक बंधारा आहे. त्याची क्षमता १४० दशलक्ष घनफूट आहे. त्यातील सर्व पाणी सोडून देण्यात आले असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले. पुणे शहर आणि परिसरात भीषण पाणीटंचाई निर्माण झालेली असताना वरसगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील लवासा येथील बंधाऱ्यात बोटिंगचा आनंद लुटला जात आहे. लवासा प्रकल्पाची पाण्याची सोय व्हावी, यासाठी वरसगाव धरणात सध्या दोन बंधारे बांधण्यात आले आहेत. जुलै महिना उजाडला, तरी धरण पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झालेला नाही. खडकवासला पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता अशोक गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, लवासा सिटीसाठी एकूण दहा बंधारे बांधण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यातील आठ बंधारे वरसगावशी संबंधित आहेत. त्यातील दासवे येथील बंधाऱ्याची ६५ दशलक्ष घनफूट व शेजारील बंधाऱ्याची क्षमता १४० दशलक्ष घनफूट आहे. त्यातील मोठ्या बंधाऱ्यातील शंभर टक्के पाणी सोडण्यात आले आहे. लवासासोबत केलेल्या करारानुसार आवश्यक असेल तेव्हा शंभर टक्के पाणी पाटबंधारे विभाग घेऊ शकते. सध्या उपलब्ध पाणी सोडण्याची सूचना देण्यात आली आहे. लवासा कॉर्पोरेशनच्या अधिका-यांशी वारंवार संपर्क साधूनही होऊ शकला नाही. (प्रतिनिधी)