शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

शालाबाह्य मुलांना शासनाचा ‘आधार’

By admin | Updated: May 11, 2015 05:59 IST

शिक्षणापासून वंचित असलेल्या समाजातील ६ ते १४ वयोगटातील शालाबाह्य बालकांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासनातर्फे शिक्षण हक्क कायद्यांतर्गत विशेष मोहीम.

पुणे : शिक्षणापासून वंचित असलेल्या समाजातील ६ ते १४ वयोगटातील शालाबाह्य बालकांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासनातर्फे शिक्षण हक्क कायद्यांतर्गत विशेष मोहीम राबविली जाणार असून, प्रत्येक गावातील शालाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्याचे आधार कार्ड शाळेशी जोडले जाणार आहे. राज्य शासनाच्या नऊ विभागाच्या सहकार्याने नवीन शैक्षणिक वर्षापासून ही मोहीम राबविण्यात येणार आहे.शिक्षण हक्क कायद्यामुळे ६ ते १४ वयोगटातील बालकाला शिक्षणाचा मोफत हक्क प्राप्त झाला. परंतु, आजही राज्यातील अनेक मुले शिक्षणाच्या मूळ प्रवाहाच्या बाहेर आहेत. त्यामुळे शासन व विविध स्वयंसेवी संस्थांकडून या मुलांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी विविध उपाय योजना राबविल्या जात आहेत. गेल्या दोन वर्षांत सुमारे ६० हजार शालाबाह्य मुलांना शाळेपर्यंत घेऊन येण्यात शिक्षण विभागाला यश मिळाले. मात्र, आजही ६ ते १४ वर्षे वयोगटातील हजारो मुले रस्त्यावर भीक मागताना, तसेच ऊसतोडणी कामगारांबरोबर आणि तमाशा कलावंताबरोबर भटकताना दिसतात. त्याचप्रमाणे भटक्या विमुक्त जाती जमातीमधील डोंबारी, कुडमुडे जोशी, पारधी या समाजातील बरीच मुले शिक्षणापासून वंचित आहेत. परंतु,अशा अधिकाधिक शालाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना शाळेत प्रवेशित करण्याची एक दिवसाची मोहीम राबविली जाणार आहे. सध्या नियमितपणे शाळेत जाणाऱ्या, परंतु आधार कार्ड नसलेल्या प्रत्येक मुलांचे आधार कार्ड काढण्याचा कालबद्ध कार्यक्रम शिक्षण विभागाने तयार केला आहे. आता शालाबाह्य मुलांचे आधारकार्डही तयार करून घेण्याचा उपक्रम राबविला जाणार आहे.शालाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना शाळेत प्रवेश दिला, तरी काही दिवसांनी या मुलांची शाळेतील उपस्थिती कमी होते अथवा काही दिवसांनी ही मुले शाळेत नियमितपणे गैरहजर राहतात. परिणामी, पुन्हा या मुलांचा शोध घ्यावा लागतो. मात्र, आता प्रत्येक शालाबाह्य मुलाचे असे आधारकार्ड काढून ते शाळांशी जोडले जाणार आहे. (प्रतिनिधी)