baramati bypoll election : बारामतीत मतदान घटल्याने खळबळ; पार्थ पवारांनी पदाधिकाऱ्यांची घेतली ‘शाळा’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2026 15:04 IST2026-04-26T12:38:59+5:302026-04-26T15:04:10+5:30

baramati bypoll election - कामगिरीवर थेट बोट; निष्क्रियांना इशारा, बूथ कमिट्यांत बदलाचे संकेत 

baramati bypoll election There is a stir in Baramati due to the decrease in voting; Parth Pawar took the office bearers to 'school' | baramati bypoll election : बारामतीत मतदान घटल्याने खळबळ; पार्थ पवारांनी पदाधिकाऱ्यांची घेतली ‘शाळा’

baramati bypoll election : बारामतीत मतदान घटल्याने खळबळ; पार्थ पवारांनी पदाधिकाऱ्यांची घेतली ‘शाळा’

बारामती : विधानसभा पोटनिवडणुकीत अपेक्षेपेक्षा कमी मतदान झाल्याने बारामतीत राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, पदाधिकाऱ्यांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर खासदार पार्थ पवार यांनी सहयोग निवासस्थानी पक्ष पदाधिकारी, नगरसेवक व बूथ कमिटी प्रमुखांची बैठक घेऊन कामगिरीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी चांगले काम करणाऱ्यांचे कौतुक केले, तर निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत इशारा दिला.

या पोटनिवडणुकीत सुरुवातीपासूनच पार्थ पवार व जय पवार यांनी प्रचाराची सूत्रे हाती घेत नियोजन केले होते. मात्र, मतदानाच्या टक्केवारीत लक्षणीय घट झाल्याने अंतर्गत कारणांचा शोध घेण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली.

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत ७१.५७ टक्के मतदान झाले होते. त्यावेळी २ लाख ७२ हजार ४०८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मात्र, एप्रिल २०२६ मधील पोटनिवडणुकीत मतदानाची टक्केवारी घसरून ५८.२७ टक्क्यांवर आली. यावेळी केवळ २ लाख २४ हजार ८७ मतदारांनी मतदान केले. म्हणजेच तब्बल ४८ हजार ३२१ मतांची (१३.३ टक्के) घट नोंदविली गेली.

विशेष म्हणजे या निवडणुकीत प्रबळ विरोधक नसताना आणि महायुती तसेच इतर घटक पक्षांचा पाठिंबा असतानाही मतदार मोठ्या प्रमाणावर मतदानासाठी बाहेर पडले नाहीत, ही बाब चिंतेची मानली जात आहे. याच पार्श्वभूमीवर पार्थ पवार यांनी पदाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधत मतदान घटण्यामागील कारणांचा आढावा घेतला.

बैठकीदरम्यान चांगली कामगिरी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला, तर अपेक्षेप्रमाणे काम न करणाऱ्यांना सुधारणा करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी काही ठिकाणी जुने वाद, गटबाजी उफाळून आली. मात्र, पवार यांनी सर्वांना एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन करीत संघटन बळकट करण्यावर भर दिला.

काही पदाधिकाऱ्यांनी तीव्र उन्हाळा, तसेच बाहेरगावी असलेले मतदार मतदानासाठी न आल्याने मतदान घटल्याचे कारण पुढे केले. दरम्यान, असमाधानकारक कामगिरी करणाऱ्या बूथ कमिट्यांमध्ये बदल करण्याचे संकेत देत पवार यांनी पुढील काळात संघटनात्मक बांधणीवर अधिक लक्ष देणार असल्याचे स्पष्ट केले.

रेकॉर्डच्या उंबरठ्यावर बारामती ?

बारामती पोटनिवडणुकीत २ लाख २४ हजार ८७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. देशातील एका विक्रमात्मक मताधिक्कयाशी तुलना करता, महायुतीच्या उमेदवाराला मिळणाऱ्या मतांच्या पार्श्वभूमीवर बारामतीत नव्या विक्रमाची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे निकालाकडे राज्यभराचे लक्ष लागले आहे.

Web Title : बारामती उपचुनाव: कम मतदान से चिंता; पवार ने अधिकारियों को फटकारा

Web Summary : बारामती उपचुनाव में कम मतदान से राजनीतिक हलचल। पार्थ पवार ने अधिकारियों के प्रदर्शन की समीक्षा की, अच्छे काम की सराहना की और निष्क्रिय सदस्यों को चेतावनी दी। मजबूत विपक्ष न होने के बावजूद मतदान में गिरावट आई, जिसके कारणों की जांच और पुनर्गठन के प्रयास किए जा रहे हैं।

Web Title : Baramati Bypoll: Low Voter Turnout Sparks Concern; Pawar Scolds Officials

Web Summary : Low voter turnout in the Baramati bypoll caused political turmoil. Parth Pawar reviewed officials' performance, praising good work and warning inactive members. Turnout dropped significantly despite no strong opposition, prompting investigation into the reasons and reorganization efforts.