पुणे: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी सात ते नऊ या दोन तासात ८.०१ टक्का इतके मतदान झाले आहे. या निवडणुकीसाठी ३ लाख ८४ ,हजार ५७९ मतदार आहेत. पहिल्या दोन तासात ३० हजार ७९८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. उन्हाची तीव्रता असल्याने मतदानाचा टक्का वाढण्यासाठी जय पवार मतदान केंद्रांवर बूथप्रमुखांच्या भेटी घेत आहेत.
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक यंत्रणा पूर्णतः सज्ज झाली आहे. सकाळपासूनच उत्सहात मतदानाला सुरुवात झाली आहे. सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. तर रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी सुद्धा सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला आहे. पवार कुटुंबियांकडून बारामतीकरांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
मतदानासाठी ४७८ मतदान केंद्रांसाठी ४७८ ईव्हीएम, ९५६ बॅलेट युनिट्स आणि ४७८ व्हीव्हीपॅट यंत्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. ही सर्व यंत्रे ६० बंदिस्त मिनी टेम्पोंद्वारे क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली सुरक्षितपणे मतदान केंद्रांवर पोहोचवण्यात आली. यंदा निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार वितरण प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे. मतदान पथकांना डिस्पॅच सेंटरवर न बोलावता थेट संबंधित मतदान केंद्रांवर जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ईव्हीएम यंत्रांसह आवश्यक फॉर्म्स, लिफाफे व इतर साहित्य थेट केंद्रांवर पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
Web Summary : Baramati bypoll sees 8.1% voting in first two hours. 30,798 voters exercised their right. Pawar family appeals for increased voter participation amid heat. Election machinery is fully prepared with EVMs delivered to polling stations.
Web Summary : बारामती उपचुनाव में पहले दो घंटों में 8.1% मतदान हुआ। 30,798 मतदाताओं ने मताधिकार का प्रयोग किया। पवार परिवार ने गर्मी के बीच मतदान बढ़ाने की अपील की। चुनाव मशीनरी पूरी तरह से तैयार, ईवीएम मतदान केंद्रों पर पहुंचाए गए।