बारामती : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी २३ एप्रिल रोजी मतदान पार पडले असून, या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी (दि. ४) महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ गोडाऊन, एमआयडीसी बारामती येथे सकाळी ८ वाजल्यापासून सुरू होणार आहे. मतमोजणीसाठी प्रशासनाने सर्वतोपरी तयारी पूर्ण केली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम दिघे यांनी दिली.
या मतमोजणीच्या कामकाजाकरिता पुरेशा अधिकारी-कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. निकालाच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था बिघडू नये याकरिता पर्याप्त व पुरेसा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात असून, त्याअनुषंगाने प्रतिबंधात्मक आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. ईव्हीएम मशीनच्या मतमोजणीसाठी २० टेबल, तर पोस्टल मतपत्रिकांच्या मतमोजणीसाठी ६ टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे. या प्रक्रियेसाठी ३० सूक्ष्म निरीक्षक, ३० मतमोजणी पर्यवेक्षक, ३० मतमोजणी सहायक तसेच इतर कर्मचारी व अधिकारी मिळून सुमारे ३०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सहा. निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्नील रावडे यांच्याकडून मतमोजणी करिता नियुक्त कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.
मतमोजणीच्या अनुषंगाने मतमोजणी केंद्रावर आवश्यक साहित्य उपलब्ध व व्यवस्था करण्यात आल्या आहेत. मतमोजणी केंद्रात प्रवेशाकरिता संबंधित कर्मचारी, उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी तसेच माध्यमांच्या प्रतिनिधींना प्रवेशिकाही देण्यात आलेल्या आहेत. दरम्यान, निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतमोजणी स्थळी प्रवेशासाठी प्रथमच क्यूआर कोड प्रणाली लागू करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांना तसेच उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना देण्यात आलेल्या प्रवेशिकांवर क्यूआर कोड देण्यात आला आहे. तो क्यूआर कोड स्कॅन करूनच प्रवेश दिला जाणार आहे. माध्यमांच्या प्रतिनिधींना फेरीनिहाय निकाल तातडीने उपलब्ध करून देण्याकरिता मतमोजणी केंद्रावर स्वतंत्र बैठक व्यवस्था (माध्यम कक्ष) तयार करण्यात आली आहे. मतमोजणी केंद्रात सर्व कर्मचारी व प्रतिनिधींना मोबाइल वापरण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
Web Summary : Baramati by-election counting set for May 4th at MIDC. Administration ensures strict security with QR code access. 300 staff deployed for EVM and postal votes. Media center established for timely updates. Mobile use prohibited, police presence strong.
Web Summary : बारामती उपचुनाव की मतगणना 4 मई को एमआईडीसी में होगी। प्रशासन ने क्यूआर कोड एक्सेस के साथ सख्त सुरक्षा सुनिश्चित की है। ईवीएम और डाक मतों के लिए 300 कर्मचारी तैनात। समय पर अपडेट के लिए मीडिया सेंटर स्थापित। मोबाइल उपयोग निषिद्ध, पुलिस की मजबूत उपस्थिति।