शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीत ढगफुटी; शेतकऱ्यांना दिलासा

By admin | Updated: July 2, 2014 01:59 IST

ढगफुटी एरवी धास्ती घेऊन येते. मात्र, बारामतीच्या दुष्काळी भागातील अनेक गावांना सोमवारी झालेल्या ढगफुटीने जीवन दिले.

बारामती/ उंडवडी : ढगफुटी एरवी धास्ती घेऊन येते. मात्र, बारामतीच्या दुष्काळी भागातील अनेक गावांना सोमवारी झालेल्या ढगफुटीने जीवन दिले. पिण्याच्या पाण्यासाठी होत असलेली पायपीट अवघ्या दीड तासाच्या पावसाने संपल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. बारामती-दौंड रस्त्यावरील या गावांना पाण्याचा दुसरा स्त्रोत्र उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांच्या पाचवीलाच दुष्काळ पुजला असल्यासारखे आहे. मागील वर्षी राज्यात सर्वत्र चांगला पाऊस झाला असताना बारामती तालुक्यात पावसाने ओढ दिली होती. त्यामुळे वर्षभर पिण्याच्या व शेतीच्या पाण्याची टंचाईचा सामना या भागातील नागरिकांना, शेतकऱ्यांना करावा लागला. पावसाळा सुरू होऊन एक महिना लोटला तरी पावसाने ओढ दिली होती. त्यामुळे उपलब्ध पाण्यावर केलेल्या खरिपाच्या पेरण्या वाया गेल्या होत्या. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी हैराण झाले होेते. दुबार पेरण्यांसाठी पावसाची आवश्यकता होती. याच पार्श्वभूमीवर सोमवारी दुपारी ४ ते ६ या दोन तासांत पावसाने होत्याचे नव्हते केले. चार वाजेपर्यंत कोरडे पडलेले तलाव, चाऱ्या, बंधारे, नाले दुथडी भरून वाहू लागले. पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात होता. या भागात कृषी आणि महसूल विभागाच्या वतीने ओढ्यांचे रुंदीकरण, खोलीकरण करण्यात आले आहे. जलसंंधारणाच्या या कामासाठी लोकसहभाग मिळाला. त्यामुळे पावसाचे पडलेले पाणी अडविण्यात यश आले. जलसंधारणाच्या कामामुळे सोमवारी पडलेल्या मुसळधार पावसाचे पाणी अडविण्यात यश आले. आगामी दोन महिन्यांत या अडविलेल्या पावसाच्या पाण्याचा शेतकऱ्यांना वापर करता येणार आहे. बारामती तालुक्यात दुष्काळी पट्ट्यात कऱ्हा नदी खोलीकरणासाठी जवळपास सर्वच ठिकाणी ओढ्यांचे खोलीकरण, रुंदीकरण केले आहे. जोरदार वाऱ्यामुळे रस्त्यालगतची झाडे उन्मळून पडली. (वार्ताहर)