Maharashtra Election 2019 : राजकीय पक्षांकडून 'इलेक्टिव्ह मेरीट' सह ' एज्यूकेशन मेरीट' चा समतोल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2019 07:00 AM2019-10-13T07:00:00+5:302019-10-13T13:12:36+5:30
राज्यामध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे..
पुणे : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. उमेदवार आपापले मुद्दे आणि आश्वासने घेऊन विकासाच्या आणि बदलाच्या गप्पा मारत आहेत. परंतू, या उमेदवारांचे शिक्षण आणि वय याचाही विचार व्हायला हवा असे तरुण मतदारांचे मत आहे. पुण्यामध्ये निवडणूक लढवित असलेल्या उमेदवारांपैकी प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचे शिक्षण तिसरीपासून इंजिनीअरींगपर्यंतचे आहे. यामध्ये बारावीच्या पुढे शिक्षण झालेले २५ तर बारावीच्या खाली शिक्षण झालेले १५ उमेदवार आहेत. यासोबतच सर्वात कमी वयाचा उमेदवार हा ३२ वर्षांचा असून सर्वाधिक वयाचा उमेदवार ६५ वर्षांचा असल्याचे प्रतिज्ञापत्रातील माहितीवरुन समोर आले आहे.
शहरातील पर्वती, कसबा, शिवाजीनगर, कॅन्टोन्मेंट, हडपसर, खडकवासला, वडगाव शेरी आणि कोथरुड मतदार संघांमध्ये निवडणूक लढवित असलेल्या भाजपा, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वंचित बहुजन आघाडी, आम आदमी पार्टीच्या उमेदवारांची प्रतिज्ञापत्रं पाहता अल्पशिक्षितांनाही या प्रमुख पक्षांनी उमेदवारी दिल्याचे स्पष्टपणे दिसते. एज्यूकेशन मेरीट पेक्षा केवळ इलेक्टिव्ह मेरीट पाहूनच अनेक उमेदवारांना उमेदवारी दिली जात असल्याची टीका राजकीय पक्षांवर केली जाते. परंतू, यंदाच्या निवडणुकीत बहुतांश उमेदवारांचे शिक्षण पदवी व त्यापेक्षा अधिक झालेले दिसून येते.
वरील प्रमुख पक्षांच्या उमेदवारांची आठही मतदार संघांमधील संख्या जवळपास ३५ च्या आसपास आहे. कॅन्टोन्मेंटमधून ह्यएआयएमआयएमह्ण निवडणूक लढवित असलेल्या खेमदेव सोनावणे यांचे शिक्षण तिसरीपर्यंत झालेले आहे. तर वडगाव शेरीमधील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रविण गायकवाड हे एमबीए झालेले सर्वाधिक शिक्षित उमेदवार आहेत. पर्वती मतदार संघामधून आपकडून निवडणूक लढवित असलेले संदीप सोनवणे (वय ३२) हे सर्वात कमी वयाचे उमेदवार आहेत. तर, कॅन्टोन्मेंट मतदार संघातील कॉंग्रेसचे उमेदवार रमेश बागवे (वय ६५) हे सर्वाधिक वयाचे उमेदवार ठरले आहेत.
====
कसबा
नाव वय शिक्षण पक्ष
मुक्ता टिळक ५४ बीए, डीबीएम-आयएमडीआर भाजपा
अरविंद शिंदे ५३ बी.कॉम कॉंग्रेस
अजय शिंदे ४६ १२ वी मनसे
विशाल धनवडे ३८ एसवाय, बी.कॉम अपक्ष
====
पर्वती
माधुरी मिसाळ ५५ बी.कॉम भाजपा
अश्विनी कदम ४६ एमए, आर्ट मास्टर राष्ट्रवादी कॉंग्रेस
संदीप सोनवणे ३२ तृतीय वर्ष एलएलबी आप
ॠषीकेश नांगरे-पाटील ३६ सिव्हिल इंजिनिअर वंचित बहुजन आघाडी
====
हडपसर
योगेश टिळेकर ४५ १२ वी भाजपा
चेतन तुपे ४८ एफवाय राष्ट्रवादी कॉंग्रेस
वसंत मोरे ४५ १२ वी मनसे
घन:शाम हाके ३५ १० वी वंचित बहुजन आघाडी
इब्राहीम शेख ५७ १० वी एमआयएम
====
कोथरुड
चंद्रकांत पाटील ६० बी. कॉम भाजपा
किशोर शिंदे ४३ एलएलबी, एमसीएम मनसे
डॉ. अभिजीत मोरे ३५ एमबीबीएस आप
दीपक शानदीरे ४८ बीए, एलएलबी वंचित बहुजन आघाडी
====
शिवाजीनगर
सिद्धार्थ शिरोळे ४० बीई-मॅकॅनिकल भाजपा
दत्तात्रय बहिरट ५७ एफवाय, बीएससी कॉंग्रेस
सुहास निम्हण ४४ १२ वी मनसे
मुकुंद किर्दत ५४ बीई आप
अनिल कुºहाडे ४० ७ वी वंचित बहुजन आघाडी
====
वडगाव शेरी
जगदीश मुळीक ३८ बीए भाजपा
सुनिल टिंगरे ४७ डिप्लोमा इन सिव्हील इंजिनीअरींग राष्ट्रवादी
प्रविण गायकवाड ५६ एमबीए, एमजे, बी.कॉम वंचित बहुजन आघाडी
गणेश ढमाले ३७ बीए आप
डॅनियल लांडगे ४५ १० वी नापास एमआयएम
====
खडकवासला
भिमराव तापकीर ५९ १२ वी भाजपा
सचिन दोडके ४१ १० वी राष्ट्रवादी
आप्पा आखाडे ४४ ९ वी नापास वंचित बहुजन आघाडी
====
कॅन्टोन्मेंट
सुनिल कांबळे ५१ ८ वी भाजपा
रमेश बागवे ६५ बीए कॉंग्रेस
लक्ष्मण आरडे ५१ ७ वी वंचित आघाडी
हिना मोमीन ५१ १० वी एमआयएम
खेमदेव सोनवणे ५१ ३ री आप