शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात सराफ व्यवसायिकांची बॅग भरदिवसा लंपास; ८०० ग्रॅम सोने, २ किलो चांदींवर चोरट्यांचा डल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2020 22:29 IST

ही घटना रविवार पेठेतील आर सी एम गुजराथी शाळेजवळ गुरुवारी सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास घडली.

पुणे : गाडीतून ऑईल लिकेज झाल्याचे सांगून मदत करण्याच्या बहाण्याने दोघा चोरट्यांनी एका सराफ व्यवसायिकांच्या गाडीतील बॅग लंपास केली. बॅगमध्ये ८०० ग्रॅम सोने व २ किलो चांदी असा ऐवज होता.याप्रकरणी सराफ व्यवसायिक करण माळी (रा. देहुरोड) यांनी फरासखाना पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना रविवार पेठेतील आर सी एम गुजराथी शाळेजवळ गुरुवारी सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माळी यांचे देहुरोड येथे सोन्याचे दुकान आहे. व्यवसायाच्या निमित्ताने ते माल खरेदी करण्यासाठी रविवार पेठेते आले होते. ते परत जात असताना चोरट्यांनी माळी यांना त्यांच्या गाडीतून ऑईल लिकेज होत असल्याची बतावणी केली. माळी हे कारमधून खाली उतरुन त्यांनी बोनेट उघडून ऑईल कोठून गळत आहे, हे पाहू लागले. ही संधी साधून चोरट्यांनी सोने व चांदी ठेवलेली बॅग चोरुन ते पळून गेले. काही वेळातच चोरट्यांनी आपल्याला फसवल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ फरासखाना पोलिसांकडे धाव घेतली. चोरीचा हा प्रकार समजताच फरासखाना पोलीस व गुन्हे शाखेच्या पथकाने चोरट्यांचा शोध सुरु केला आहे.चोरट्यांच्या बतावणीला सराफ व्यवसायिक भुलले़ त्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी सोने चांदी असलेली बॅग चोरुन नेली असून चोरट्यांचा शोधासाठी पथके रवाना झाली असल्याचे फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेThiefचोरPoliceपोलिसGoldसोनंtheftचोरी