शहरं
Join us  
Trending Stories
1
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
2
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
3
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
4
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
5
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
6
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
7
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
8
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
9
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
10
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
11
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
12
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
13
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
14
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
15
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
16
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
17
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
18
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
19
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर नीरेत साधेपणाने गणेशोत्सव

By admin | Updated: September 24, 2015 02:53 IST

पुरंदर तालुक्यातील नीरा शहरात यंदा गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात येत आहे. काही मंडळांनी यंदा उत्सवामध्ये खर्चात काटकसर करून दुष्काळग्रस्तांना आर्थिक

नीरा : पुरंदर तालुक्यातील नीरा शहरात यंदा गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात येत आहे. काही मंडळांनी यंदा उत्सवामध्ये खर्चात काटकसर करून दुष्काळग्रस्तांना आर्थिक मदत करण्याच्या दृष्टीने नियोजन केले आहे. वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविणारी मंडळे देखील साधेपणाने गणेशोत्सव साजरा करत आहेत. पुरंदर तालुक्यात गणेशोत्सवामध्ये दरवर्षी विविध समाजप्रबोधनपर तसेच ऐतिहासिक आकर्षक देखावे सादर करण्यामध्ये नीरा शहरातील गणेश मंडळांची आघाडी असते. मात्र, यंदा नीरा बाजारपेठेवर दुष्काळी स्थितीचा गंभीर परिणाम झाल्याने नीरा शहरातील गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा होत असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र यंदा नीरा गणेशोत्सवात आकर्षक देखावे नसल्याने भाविकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. नीरा शहरातील सर्वांत जुन्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा फुग्यांची आकर्षक सजावट करून साधेपणाने गणेशोत्सव साजरा केला आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने खर्चात काटकसर करून दुष्काळग्रस्तांना दहा हजार रुपयांची मदत करण्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे. त्रिमूर्ती गणेश मंडळाने यंदा सुवर्णमंदिराचा देखावा सादर केला आहे. हनुमान तरुण मंडळाने तर वीर येथील देवस्थान म्हस्कोबा मंदिराचा देखावा सादर केला आहे. नीरेतील जय भवानी - जीवनदीप तरुण मंडळ, शिवाजी तरुण मंडळ, बुवासाहेब तरुण मंडळ, शिवगणेश तरुण मंडळ, कानिफनाथ तरुण मंडळ, अमरदीप तरुण मंडळ, अष्टविनायक तरुण मंडळ, गणराज तरुण मंडळ, स्वराज्य मित्र मंडळ आदी विविध छोटी-मोठी मंडळे साधेपणाने गणेशोत्सव साजरा करत आहेत. या मंडळांपैकी काही मंडळांकडून दुष्काळग्रस्तांसाठी आर्थिक मदत केली जाणार असल्याचे संबंधित मंडळांच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. काही मंडळांनी करमणुकीचे कार्यक्रम आणि विविध स्पर्धांचे आयोजन करून आकर्षक पारितोषिके जाहीर केली आहेत. दरम्यान, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक रामदास शेळके, फौजदार श्रीकांत देव यांच्यासह पोलीस हवालदार सुदर्शन होळकर, सुरेश गायकवाड, घनश्याम चव्हाण आदी पोलीस आणि होमगार्ड कर्मचाऱ्यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. (वार्ताहर)