पाक गँगस्टर शहजाद भट्टी प्रकरणी ATS ची मोठी कारवाई; पुण्यासह राज्यातील ५७ जण चौकशीच्या रडारवर

By किरण शिंदे | Updated: May 13, 2026 21:25 IST2026-05-13T21:25:05+5:302026-05-13T21:25:05+5:30

राज्यातील तब्बल ५७ जण एटीएसच्या रडारवर असल्याची माहिती समोर आली आहे.

ats takes major action in pakistani gangster shahzad bhatti case 57 people from pune other places in states on radar for investigation | पाक गँगस्टर शहजाद भट्टी प्रकरणी ATS ची मोठी कारवाई; पुण्यासह राज्यातील ५७ जण चौकशीच्या रडारवर

पाक गँगस्टर शहजाद भट्टी प्रकरणी ATS ची मोठी कारवाई; पुण्यासह राज्यातील ५७ जण चौकशीच्या रडारवर

किरण शिंदे, पुणे: महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) मंगळवारी सकाळपासून राज्यभरात मोठी कारवाई सुरू केली आहे. पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या संशयित व्यक्तींची चौकशी करण्यात येत असून, राज्यातील तब्बल ५७ जण एटीएसच्या रडारवर असल्याची माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहजाद भट्टी हा सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना देशविघातक कारवायांसाठी प्रवृत्त करत असल्याचा संशय आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एटीएसने १३ मे २०२६ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून ही विशेष मोहीम हाती घेतली आहे.

पुणे शहरातील वारजे परिसरासह पुणे जिल्ह्यातील चाकण आणि शिरूर भागात एटीएसच्या पथकांनी छापेमारी करत  कारवाई सुरू केली. संशयितांच्या घरांची तपासणी करण्यात आली असून त्यांच्या मोबाईल, सोशल मीडिया अकाउंट्स आणि संपर्कातील व्यक्तींची माहिती तपासली जात आहे.

दरम्यान रडारवर असलेल्या व्यक्ती शहजाद भट्टीसोबत सोशल मीडियाद्वारे संपर्क होत्या का? तसेच त्यांच्यामार्फत कोणत्या माहितीची देवाणघेवाण झाली का? याचा तपास एटीएसकडून केला जात आहे. राज्यभरातील विविध ठिकाणी सुरू असलेल्या या कारवाईमुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. एटीएसकडून संबंधित व्यक्तींना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात येत असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती एटीएस सूत्रांनी दिली आहे..

Web Title : पाकिस्तानी गैंगस्टर मामले में एटीएस की छापेमारी: 57 जांच के दायरे में

Web Summary : महाराष्ट्र एटीएस ने पाकिस्तानी गैंगस्टर शहजाद भट्टी से जुड़े 57 लोगों की जांच शुरू की। भट्टी पर ऑनलाइन कट्टरपंथीकरण का शक है। पुणे, चाकन और शिरूर में छापे मारे गए, फोन और सोशल मीडिया की जांच हो रही है। भट्टी युवाओं को राष्ट्रविरोधी गतिविधियों के लिए उकसा रहा था।

Web Title : ATS Raids on Pakistan Gangster Case: 57 Under Investigation

Web Summary : Maharashtra ATS investigates 57 individuals statewide for links to Pakistani gangster Shahzad Bhatti, suspected of online radicalization. Raids occurred in Pune, Chakan, and Shirur, examining phones and social media. Bhatti is believed to have been influencing young individuals for anti-national activities.