शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून आणखी एकाचा खून, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
2
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
3
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
4
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
5
Giorgia Meloni: बारटेंडर ते देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान; जाणून घ्या इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांची न ऐकलेली कहाणी
6
Twisha Sharma : 'लिगेचर रिपोर्ट' समोर आल्याने मृत्यूचे कारण स्पष्ट; पण संशयाची सुई अजूनही सासरच्यांवर!
7
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
8
'Welcome to Rome, my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
9
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
10
"...तर मीदेखील मेलो असतो", 'नटसम्राट'बद्दल नाना पाटेकरांनी केलेल्या वक्तव्याने उंचावल्या भुवया, म्हणाले...
11
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
12
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
13
गश्मीर महाजनी 'देऊळ बंद २'मध्ये दिसणार? मोहन जोशींना म्हणाला, "स्वामींनी आदेश दिलाय तर..."
14
Vastu Shastra: बाथरूममध्ये बादली रिकामी ठेवताय? घरात दारिद्र्य आणणाऱ्या 'या' ३ चुका आजच सुधारा
15
कागोशिमा भूकंपाने जपान पुन्हा हादरले; ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे हादरे, प्रशासनाने जारी केला महत्त्वाचा अलर्ट!
16
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
17
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
18
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
19
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
20
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
Daily Top 2Weekly Top 5

...अखेर पुण्यात सोनसाखळी चोरट्यांना अटक, चोरीचे सोने घेणार्‍या सराफाच्या आवळल्या मुसक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2021 19:03 IST

गुन्ह्यातील एकूण ५७ ग्रॅम सोन्याचे दागिने, ३ मोटारसायकली असा एकूण ४ लाख १३ हजार रुपायांचा माल जप्त

ठळक मुद्देदोघांविरुद्ध तब्बल १६ सोनसाखळी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्यातील एक जण हा हडपसर येथील सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यात बऱ्याच दिवसांपासून फरार होता.

पुणे: शहरातील विविध भागातून दुचाकी चोरी करुन सोनसाखळी हिसकाविणार्‍या सराईत चोरट्यांना गुन्हे शाखेच्या युनिट ५ च्या पथकाने पकडले आहे. दीपक परशुराम माळी (वय २२, रा. केशवनगर, मुंढवा) आणि मुकेश सुनिल साळुंखे (वय १९, रा. मुंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून चोरीचे सोने विकत घेणारे सराफ सम्राट हुकुमसिंग भाटी याला अटक केली असून त्याच्याकडून गुन्ह्यातील एकूण ५७ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. आरोपींकडून ३ मोटारसायकली असा एकूण ४ लाख १३ हजार रुपायांचा माल जप्त करण्यात आला आहे.

सोनसाखळी चोरणारे सराईत चोरटे हडपसर परिसरात थांबल्याची माहिती पोलीस अंमलदार अजय गायकवाड आणि चेतन चव्हाण यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी सापळा रचून दीपक व मुकेश यांना ताब्यात घेतले. त्यांनी एप्रिल महिन्यात दौंड परिसरातून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून ४ सोनसाखळी चोरी आणि एक वाहनचोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात आला.

दोघांविरुद्ध तब्बल १६ सोनसाखळी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. मुकेश साळुंखे हा हडपसर येथील सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यात बऱ्याच दिवसांपासून फरार होता.

टॅग्स :PuneपुणेHadapsarहडपसरPoliceपोलिसArrestअटकCrime Newsगुन्हेगारी