शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

तामिळनाडुतून फुटला आर्मी रिलेशन परीक्षेचा पेपर; वेलिंग्टन येथून मेजरला अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2021 20:31 IST

दिल्लीपर्यंत कनेक्शनची शक्यता

ठळक मुद्देया प्रकरणात आतापर्यंत दोन गुन्हे दाखल झाले असून त्यात १० जणांना अटक

पुणे : आर्मी रिलेशन भरती प्रक्रियेच्या लेखी परीक्षेची प्रश्न पत्रिका तामिळनाडुतून लिक झाल्याचे पुरावे पुणे पोलिसांच्या हाती लागले असून तामिळनाडुतील मेजर दर्जाच्या लष्करी अधिकार्याने ही प्रश्नपत्रिका फोडल्याचे निष्पन्न झाले आहे.

थिरु मुरुगन थंगवेलू (वय ४७, रा. लेक व्हिव्यु, ऑफिसर्स एन्कलेव्ह, वेलिंग्टन, जि. निलीगरी, तामिळनाडु) या मेजरला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने अधिक तपासासाठी १५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत दोन गुन्हे दाखल झाले असून त्यात १० जणांना अटक करण्यात आली आहे.

आर्मी रिलेशन भरती प्रक्रियेच्या लेखी परीक्षा २८ फेब्रुवारी रोजी होती. त्याअगोदर परीक्षार्थींना पेपर पुरविणारी टोळी कार्यरत असल्याची माहिती आर्मीच्या गुप्तचर विभागाला मिळाली. गुप्तचर विभाग व पुणे पोलीस यांनी पुण्यातील विश्रांतवाडी, घोरपडी, बारामती येथील माळेगाव येथे छापे टाकून परिक्षार्थींना प्रश्नपत्रिका पुरविणाऱ्यांना अटक केली. यातील सेवानिवृत्त लष्करी अधिकारी भारत अडकमोळ (वय ३७, रा. पाचोरा) याच्याकडे ही प्रश्नप्रत्रिका आली होती. याचे दोन साथीदार कुमार परदेशी (रा. फलटण, ता. सातारा) आिण योगेश शंकर गोसावी (रा. माळेगाव, ता. बारामती) हे दोघे फरार आहेत.

अटक केलेल्या ५ जणांकडे केलेल्या तपासात अडकमोळ याच्याकडे ही प्रश्नपत्रिका आली होती. त्याच्याकडे केलेल्या तपासात त्याला ती तामिळनाडुतील मेजर थिरु याच्याकडून आल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार पुणे पोलिसांनी थिरु याला रविवारी तामिळनाडुतून अटक केली. त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी सांगितले की, आरोपीनी आर्मी रिलेशन भरती प्रक्रियेचा लेखी परीक्षा पेपर लिक करुन तो संपर्कातील उमेदवारांना देण्याच्या उद्देशाने वितरीत केला. भारत अडकमोल याला लेखी परिक्षेची प्रश्न पत्रिका थिरु थंगवेल याने मोबाईलवरुन व्हॉटसॲपद्वारे पाठविली होती. दोघांनीही त्यांच्या मोबाईलवरील व्हॉटसॲपद्वारे केलेले संभाषण डिलीट केलेले आहे. याबाबत आरोपीकडे तपास करुन पुरावा गोळा करावयाचा आहे. थिरु थंगवेलू याला प्रश्नपत्रिका कोणाकडून मिळाली याबाबत तपास करुन त्यांची नावे निष्पन्न करावयाची आहेत. थंगवेलू याने अजून कोणाकोणाला ही प्रश्नपत्रिका वितरीत केली आहे, याचा तपास करावयाचा आहे. थिरु थंगवेलू आणि भारत अडकमोल यांच्यात काय व्यवहार झालेला आहे.

दिल्ली कनेक्शनची शक्यतालष्कराला ही लेखी परिक्षा प्रश्नपत्रिका लिक झाल्याने रद्द करावी लागली होती. त्यामुळे लष्कराने हा संपूर्ण प्रकार गांभीर्याने घेतला आहे. आर्मीने त्यांच्या पातळीवरही याची चौकशी सुरु केली आहे. यासंबंधात दिल्लीमध्येही छापेमारी करण्यात आल्याचे सांगण्यात येते. ही प्रश्नपत्रिका फुटण्यामागे दिल्ली कनेक्शन असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

टॅग्स :Puneपुणेexamपरीक्षाIndian Armyभारतीय जवानfraudधोकेबाजीPoliceपोलिसArrestअटक