शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

घरकुल मिळूनही लाभार्थी पत्र्याच्या शेडमध्ये

By admin | Updated: May 26, 2014 05:35 IST

बारामती शहरातील आमराई परिसरात सुहासनगर येथील झोपडपट्टी सुधार योजनेअंतर्गत ८२ घरकुलांची इमारत बांधण्यात आली आहे.

बारामती : बारामती शहरातील आमराई परिसरात सुहासनगर येथील झोपडपट्टी सुधार योजनेअंतर्गत ८२ घरकुलांची इमारत बांधण्यात आली आहे. ५ महिन्यांपूर्वी या घरांचा ताबा देखील लाभार्थ्यांना देण्यात आला आहे. मात्र, वीज, पाण्याअभावी येथील रहिवाशांना अद्याप पत्र्याच्या शेडमध्ये वास्तव्य करावे लागत आहे. या ठिकाणी मुलभूत सुविधा नसल्याने नागरिकांची, विशेषत: महिलांची कुचंबना होत आहे. सुहासनगर येथे घरकुल बांधताना येथील नागरिक टेलिफोन भवन परिसरात स्थलांतरीत झाले आहे. मात्र, सोसायटी स्थापन करून वीज, पाणी मागणीअर्ज भरणे येथील लाभार्थ्यांनी भरणे आवश्यक आहे, असे मुख्याधिकारी रवी पवार यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, येथील नागरिकांना याबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही. लाईट, पाणी नसल्याने घरकुल ताब्यात मिळून देखील लाभार्थी नागरिकांना पत्र्याचे शेडमध्ये वास्तव्य करावे लागत आहे. बारामती शहरातील टेलिफोन भवन समोर असणार्‍या गाळ्यांमध्ये नागरिकांनी नाईलाजास्तव संसार थाटले आहे. रमाईमाता भवन परिसरात हे नागरिक पत्र्याचे शेड ठोकून वास्तव्यास आहेत. रमाईमाता भवन परिसरात सांडपाणी सोडण्यात येते. मुलभूत सुविधांअभावी या ठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. ५ महिन्यांपूर्वी घराचा ताबा मिळाला आहे. मात्र, लाईट, पाणी नसल्याने अद्याप लाभार्थी या ठिकाणी वास्तव्यास आलेले नाही. घाणीमुळे मोकाट जनावरांचा वावर कायम असतो. तर महिलांना उघड्यावर स्वयंपाक करावा लागतो. घराचा विषय मार्गी लावला, आता वीज, पाण्याचा विषय लवकरात लवकर मार्गी लावावा, अशी मागणी येथील नागरिक सुनिल चव्हाण यांनी केली आहे. अधिका-यांच्या उदासीनतेमुळे हा विषय मार्गी लागला नाही, अशी तक्रार येथील नागरिकांनी केली. सोसायटी स्थापन करून वीज, पाणी पुरवठा करणे नगरपरिषदेसाठी एका दिवसाचे काम आहे. मात्र, सामान्य लाभार्थ्यांमधून सोसायटी चेअरमन निवड केली जात नाही. याच चेअरमन निवडीच्या आग्रहातून या ठिकाणी सुविधा झाल्या नाहीत, असा आरोप काळुराम चौधरी यांनी केला आहे.