शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

अनंत चतुर्दशीला शहरातील सर्व दुकानं, मॉल बंद ठेवण्यात यावीत; पुणे महापालिकेचे आदेश जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2021 22:19 IST

आदेशाचे पालन न केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ च्या कलम ५१ ते ६० तसेच कलम १८८ नुसार संबंधितांवर कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही महापालिकेने स्पष्ट केले आहे

ठळक मुद्दे घरच्या घरी गणेश मूर्ती विसर्जनासाठी अमोनियम कार्बोनेट जवळच्या क्षेत्रिय कार्यालयामध्ये तसेच गणेश मुर्ती संकलन केंद्रांवर उपलब्ध

पुणे : अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जनाच्या दिवशी म्हणजे येत्या रविवार १९ सप्टेंबरला शहरातील सर्व प्रकारची दुकाने आणि मॉल्स (अत्यावश्यक सेवा वगळून) संपूर्ण दिवस बंद ठेवण्यात यावेत. असे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी जारी केले आहेत. 

गणेश विसर्जनासाठी रस्त्यांवर होणारी गर्दी रोखण्यासाठी व कोरोना संसर्ग रोखण्याच्यादृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान या दिवशी महापालिका हद्दीतील सर्व हॉटेल, रेस्टॉरंट, फूडकोर्ट (मॉलमधील वगळून) पूर्ण दिवस चालू राहतील. हे सर्व आदेश खडकी व पुणे कॅन्टॉमेंट बोर्ड हद्दीतील दुकांनाही लागू राहणार आहेत. या आदेशाचे पालन न केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ च्या कलम ५१ ते ६० तसेच कलम १८८ नुसार संबंधितांवर कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही महापालिकेने स्पष्ट केले आहे.  गणेश विसर्जनासाठी महापालिकेची तयारी 

पुणे महापालिकेने गणेश विसर्जनासाठी तयारी पूर्ण केली असून, सर्व क्षेत्रिय कार्यालय / प्रभागनिहाय गणेश मुर्ती संकलन केंद्र व फिरते विसर्जन हौद यांची व्यवस्था केली असल्याची माहिती दिली आहे. घरच्या घरी गणेश मूर्ती विसर्जनासाठी अमोनियम कार्बोनेट जवळच्या क्षेत्रिय कार्यालयामध्ये तसेच गणेश मुर्ती संकलन केंद्रांवर उपलब्ध करण्यात आले आहेत. तसेच प्रत्येक सोसायटीमधून निर्माल्य वेगळे उचलण्यासाठी सोय देखील करण्यात आली आहे.  याबाबतच्या अधिक माहितीसाठी व घराजवळील व्यवस्थेसाठी नागरिकांनी़ https://pmc.gov.in/GaneshFestival_2021 या लिंकवर क्लिक करावे असे आवाहन महापालिकेने केले आहे़

टॅग्स :PuneपुणेGanpati Festivalगणेशोत्सवPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाPoliceपोलिसMayorमहापौर