शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकरी मदतीचा मुद्दा गाजला; कृषिमंत्री आधी म्हणाले, ‘नाही’ नंतर म्हणाले, ‘हो, प्रस्ताव आला’
2
आजचे राशीभविष्य, ४ डिसेंबर २०२५: अचानक धनप्राप्ती अन् विविध फायदे होतील, ज्याने आनंदित व्हाल
3
Orange Gate Tunnel: सोळा मजली उंच इमारतीइतक्या खोल, ७०० इमारतींखालून जाणार ऑरेंज गेट बोगदा
4
लंकादहन: भाजप-शिंदेसेनेतील वाद गाजला, सत्तापक्षांतील वादांचे निवडणुकीत झाले प्रदर्शन
5
Indigo Flights Issue: ...म्हणून इंडिगोची सेवा ढेपाळली; १०० पेक्षा जास्त विमाने झाली रद्द
6
राज्यात सरासरी ६७.६३% मतदान; तळेगाव दाभाडे तळात, तर कोल्हापुरातील मुरगूड अव्वल 
7
नवी मुंबईतील शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश
8
मुंबईसह देशभर विमानतळांवर गोंधळ, २०० विमाने झाली रद्द; बोर्डिंग पास हाताने लिहिण्याची आली वेळ 
9
महामुंबईतील १९ आरएमसी प्लांट बंद, तीन उद्योगांची प्रत्येकी पाच लाखांची बँकहमी जप्त
10
महाडमध्ये दोन गटांतील राड्याप्रकरणी विकास गोगावलेंसह २० जणांवर गुन्हा, परस्परविरोधी तक्रारी दाखल
11
इंडिगोची दोन्ही विमाने रद्द; १२ तास ताटकळले संभाजीनगरकर
12
IND vs SA : मार्करमच्या सेंच्युरीच्या जोरावर द.आफ्रिकेचा मोठा पराक्रम; ऐतिहासिक विजयासह साधला बरोबरीचा डाव
13
“माझ्या भावाला BJPशी मैत्री हवी, पण मुनीर भारताशी युद्ध…”; इम्रान खानची बहीण नेमके काय म्हणाली?
14
IND vs SA Turning Point Of The Match : ती एक चूक नडली! यशस्वीमुळे टीम इंडिया ठरली अपयशी
15
दिल्ली पोटनिवडणुकीत भाजपाला धक्का, काँग्रेसने खाते उघडले; आम आदमी पक्षाचे काय झाले?
16
२० वर्षांनी राज ठाकरे घरी गेले, सक्रीय होताच संजय राऊतांना भेटले; अर्धा तास चर्चा, काय घडले?
17
IND vs SA : पंचांनी चेंडू बदलून दिला, पण... KL राहुलनं कोणावर फोडलं पराभवाचं खापर?   
18
नगर पंचायत-परिषदा निवडणुकीचा मुद्दा संसदेत; सुप्रिया सुळेंचे सरकारवर टीकास्त्र, म्हणाल्या...
19
शतकातील सर्वात दीर्घ सूर्यग्रहण, ६ मिनिटे २३ सेकंदांपर्यंत पसरेल अंधकार, कोणकोणत्या देशांत दिसणार? भारतात कुठे-कुठे दिसणार? जाणून घ्या
20
अजय देवगनकडे या कंपनीचे १०००००० शेअर, आता कंपनीने  घेतला मोठा निर्णय; दिलाय 6000% चा बंपर परतावा!
Daily Top 2Weekly Top 5

Ajit Pawar: शहाण्यांनी वाळू, लोखंडी पट्ट्या चोरल्या...! विकासकामे खराब करणाऱ्यांना अजितदादांनी फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 18:58 IST

विकासकामे खराब करणाऱ्यांचे व्हिडिओ आणून देणाऱ्याला १ लाख बक्षीस देईल, आणि त्याला २ लाख दंड लावेल

बारामती: बारामतीत वृद्ध माणसांना बसायला तिथे जागा केली. तसेच लहान मुलांच्या खेळण्याच्या ठिकाणी त्यांना जखमा होऊ नयेत म्हणून समुद्रातील वाळू आणून टाकली. मात्र, काही शहाण्यांनी रात्री त्यातली वाळू पिशवीत भरून चोरली, ही जित्राबं माझ्या बारामतीत का आहेत? मला प्रश्न पडलाय यांचा कायमचा बंदोबस्त झाला पाहिजे. मी काही चांगलं केलंय त्या ठिकाणी ते गोधड्या वाढायला आणून टाकत आहेत.अरे तुझ्या घरात काय टाकायचे ते टाक ना मी जे चांगले केले त्याचा आणून का टाकतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विकासकांमांना चोऱ्या करुन बाधा आणून  कामे खराब करणाऱ्या अज्ञातांना फटकारले.

बारामती देशातील सुंदर शहर बनविण्याचे स्वप्न आहे.त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहरात विविध विकासकामे हाती घेतली आहेत.मात्र, काही जणांनी यामध्ये चोऱ्या सुरु केल्या असल्याची खंत उपमुख्यमंत्री पवार यांनी एका कार्यक्रमाच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने बोलताना व्यक्त केली. ते पुढे म्हणाले, बारामती दररोज वेगवेगळ्या विकासकामांनी चर्चेत असते. या ठिकाणी सातत्याने विकास कामे सुरू आहेत. बारामतीत एवढा मोठा चांगला ब्रिज केला आहे. असं असताना देखील तिथं काहीजण चोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. तिथे पायरी खराब होऊ नये म्हणून लावलेला लोखंडी अँगल तोडून नेत आहेत. अशा पट्ट्या चोरून नेतात आणि उद्या विकून टाकतात. उद्या एखाद्या वेळेस त्या ब्रिजवरून कोण चाललं आणि तो ब्रिज पडला, तर पुन्हा म्हणणार कशा पद्धतीने विकास केलाय, मात्र असं जर कोण करत असल्यास मोबाईल मध्ये त्याला न कळता त्याचं चित्रीकरण करा आणि मला आणून द्या. जो ते मला आणून देईल त्याला मी 'एक लाख' रुपयाचे बक्षीस देईल. जो सापडेल त्याला दोन लाख दंड करतो. म्हणजे त्यातील एक लाख रुपये याला देऊन टाकू आणि एक लाख रुपये नगरपालिकेला देऊन टाकू,असे पवार म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Ajit Pawar Slams Thieves for Vandalizing Baramati Development Projects

Web Summary : Ajit Pawar criticized individuals stealing materials from Baramati's development projects, including sand and metal strips from a bridge. He offered a reward for information leading to their capture and threatened hefty fines, part of which would be given as a reward to the informant.
टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMahayutiमहायुतीPoliceपोलिसMONEYपैसा