अजित पवारांच्या राजकीय वारशाचे शिवधनुष्य कोण पेलणार? बहीण, पत्नी, दोन पुतणे की मुलगे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 21:04 IST2026-01-29T21:02:25+5:302026-01-29T21:04:27+5:30

कर्तृत्वाच्या बळावर देश आणि राज्यात मोठी राजकीय ओळख निर्माण करणार्या ‘अजितदादां’चा वारसा हक्काबाबत चर्चांना उधाण आले आहे.

Ajit Pawar Funeral Who will carry the Shiv Dhanush to carry out Ajit Pawar's succession? | अजित पवारांच्या राजकीय वारशाचे शिवधनुष्य कोण पेलणार? बहीण, पत्नी, दोन पुतणे की मुलगे...

अजित पवारांच्या राजकीय वारशाचे शिवधनुष्य कोण पेलणार? बहीण, पत्नी, दोन पुतणे की मुलगे...

बारामती  - अजून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या चितेची राखही शांत झालेली नाही तोच अजित पवारांचा उत्तराधिकारी कोण ठरणार, यासंदर्भातील चर्चांची ठिणगी पडली आहे. कर्तृत्वाच्या बळावर देश आणि राज्यात मोठी राजकीय ओळख निर्माण करणाऱ्या ‘अजितदादां’चा वारसा कोण चालविणार याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत. 

पवार कुटुंबाने नेहमीच कौटुंबिक संबंध आणि राजकारण एकत्र येऊ दिले नाही. त्यांचा एकोपा कायम अबाधितच राहिला. मात्र,२०२४ मध्ये पवार कुटुंबिय आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर बारामतीचे चित्र बदलून गेले होते. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर शहर आणि तालुक्याच्या राजकारणात मोठे बदल झाले. या दोन्ही निवडणुकीत पवार विरुध्द पवार लढत बारामतीकरांनी काळजावर दगड ठेवत अनुभवली. मात्र,नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुका दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत लढविल्या. तसेच काही दिवसांवर येवून ठेपलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका दोन्ही पक्षांनी एकत्र येत लढविण्याची भुमिका घेतली. त्यानंतर दोन्ही पक्ष एकाच पक्षाच्या झेंड्याखाली येणार असल्याच्या चर्चेने जोर धरला, यावर निवडणुकीनंतर निर्णय होणे अपेक्षित असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अकाली ‘एक्झिट ’ झाली आणि कार्यकर्त्यांना सगळेच ठप्प झाल्यासारखे वाटू लागले आहे. 

महायुतीत सत्तेत सहभागी असणाऱ्या राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे अध्यक्ष होते. त्यामुळे आता सत्तेत सहभागी असणाऱ्या उपमुख्यमंत्री पवार यांची जागा कोण घेणार? याच्या चर्चांना आतापासूनच उधाण आले आहे. अजित पवारांचा उत्तराधिकारी सुनेत्रा वहिनीच असाव्यात असे वक्तव्य अजित पवारांच्या पक्षाचे नेते नरहरी झिरवाळ यांनी केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची धुरा आता सुनेत्रा पवार सांभाळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास महायुतीत हा पक्ष सहभागी होणार का, यावर बरीचशी राजकीय गणितं अवलंबून आहेत. उपमुख्यमंत्री पवार यांचा दांडगा राजकीय अनुभव आणि कौशल्य, नेतृत्व सर्वज्ञात आहे. त्यामुळे त्यांचा वारसाहक्क चालविण्याचे शिवधनुष्य कोण पेलणार, हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरीतच आहे.

बारामतीत अर्थकारणाशी संबंधित सहकारी साखर कारखाने,सहकारी संस्थांवर उपमुख्यमंत्री पवार यांचे एकहाती वर्चस्व आहे. उपमुख्यमंत्री पवार यांनी मोठ्या कष्टाने आणि नियोजनाने या संस्था नावारुपाला आणल्या. संस्थांना शिस्त लावली. त्यामुळे त्यांची बरोबरी करणाऱ्या नेत्याचा, तसेच त्याप्रमाणे काम करणाऱ्या नेत्यालाच बारामतीकर स्वीकारतील. दोन्ही राष्ट्रवादी एकाच झेंड्याखाली एकत्र आल्यास त्याचे देश आणि राज्यात एकहाती नेतृत्व कोण करणार, याची सर्वांनाच उत्सुकता आहे. पवार कुटुंबियांमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार पक्षनेतृत्व करतील की नाही याबाबत साशंकता आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का, महायुतीच्या सत्तेत सहभागी होण्याबाबत निर्णय घ्यावा लागणार आहे. खासदार सुनेत्रा पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह आमदार रोहित पवार,अजित पवार यांची मुले पार्थ पवार, जय पवार, पुतणे युगेंद्र पवार यांची नावे चर्चेत आहेत. त्यामुळे कोण होणार ‘अजितदादां’चा राजकीय वारस हा प्रश्न सध्यातरी निरुत्तरीतच आहे.

Web Title : अजित पवार की विरासत: राजनीतिक मशाल कौन थामेगा?

Web Summary : अजित पवार के निधन के बाद, उनके उत्तराधिकारी को लेकर अटकलें तेज हैं। विभाजन के बाद पारिवारिक एकता की परीक्षा है। सुनेत्रा पवार पार्टी और उनकी विरासत का नेतृत्व करने की संभावित उम्मीदवार हैं, खासकर बारामती के सहकारी क्षेत्र में। एनसीपी का भविष्य और सत्तारूढ़ गठबंधन में उसकी भूमिका अनिश्चित है।

Web Title : Ajit Pawar's Legacy: Who Will Carry the Political Torch?

Web Summary : Following Ajit Pawar's passing, speculation arises about his successor. Family unity faces tests post-split. Sunetra Pawar is a potential candidate to lead the party and his legacy, especially in Baramati's cooperative sector. The future of NCP and its role in the ruling alliance remain uncertain.