शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

ज्या कार्यकर्त्यांचा तीनवेळा विनामास्क फोटो, त्यांचं तिकीट कट : सुप्रिया सुळेंचा गर्भित इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2021 18:34 IST

कोरोना नियमांचं पालन करण्यावरून अजितदादांचं कौतुक 

इंदापूर : कोरोनाच्या पहिल्या दिवसापासून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोरोना नियमांबाबत जागरूक असल्याचे पाहायला मिळाले आहे. स्वतःसह आपल्या कार्यकर्त्यांना देखील ते कोरोना नियमाचे पालन करण्याविषयी आग्रही भूमिकेत असतात. याचवरुन बेशिस्त कार्यकर्त्यांचे वेळोवेळी ते कान टोचतानाही दिसत असतात. आता राष्ट्रवादीच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील कोरोना नियमांचं पालन न करणाऱ्या कार्यकर्त्यांना गर्भित इशारा दिला आहे. त्यांनी ज्या सदस्यांचे तीन वेळा विनामास्क फोटो पुढे येतील त्यांना तिकीटच देऊ नका, असा आदेशच सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांना दिला आहे. 

खासदार सुप्रिया सुळे गुरुवारी (दि. १७) इंदापूर दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी एका कार्यक्रमात बोलत होत्या. सुळे म्हणाल्या, कोरोनामुळे अनेक कुटुंब उध्वस्त झाली आहे. यात बऱ्याच कुटुंबांनी तर आपला कर्ता माणूस गमावला आहे. त्याचबरोबर दुसरीकडे आई किंवा वडील तर काही कुटुंबात दोघांनाही कोरोनाने हिरवल्यामुळे अनेक मुलं अनाथ झाली आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत या मुलांना आधाराची खूप आवश्यकता आहे. अनाथ झालेलं एकही मुल मायेच्या आधारापासून वंचित राहू नये यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या यंत्रणांनी परस्पर सामंजस्य व गांभीर्याने काम करण्याची आवश्यकता आहे.

कोरोना नियमांचं पालन करण्यावरून अजितदादांचं कौतुक अजितदादांचा मास्क दीड वर्षात खाली आला नाही. कुठल्या कारणासाठी मास्क काढावा लागला तर ते काही सेकंदात पुन्हा घालतात, अशा शब्दात त्यांच्यावर कौतुक केले आहे. अशावेळी माझी जिल्हाध्यक्षांना विनंती आहे की, ज्या सदस्यांचे तीन वेळा विनामास्क फोटो पुढे येतील त्यांना तिकीटच देऊ नका, असा आदेशच सुप्रिया सुळे यांनी दिलाय. त्याचबरोबर मागील दीड वर्ष आणि पुढील एक वर्ष पंतप्रधान मोदी यांनी आमचा खासदार निधी कापल्याचंही त्यांनी सांगितलं.

टॅग्स :IndapurइंदापूरSupriya Suleसुप्रिया सुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेसcorona virusकोरोना वायरस बातम्याAjit Pawarअजित पवार