Pune Porsche Accident: ‘सेकंड ब्लड सॅम्पल’मुळे १९ महिने श्रीमंत घरातील आरोपी गजाआड, देशातील पहिले उदाहरण, आयुक्तांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 10:14 IST2025-12-30T10:13:21+5:302025-12-30T10:14:07+5:30

‘तुम्ही कितीही श्रीमंत असलात, तरी आपत्तीजनक कृत्य केल्यास जेलमध्येच जागा आहे,’ हा संदेश पुणे पोलिसांनी दिला आहे

Accused from a wealthy family was held for 19 months due to a 'second blood sample', the first example in the country, according to the commissioner | Pune Porsche Accident: ‘सेकंड ब्लड सॅम्पल’मुळे १९ महिने श्रीमंत घरातील आरोपी गजाआड, देशातील पहिले उदाहरण, आयुक्तांची माहिती

Pune Porsche Accident: ‘सेकंड ब्लड सॅम्पल’मुळे १९ महिने श्रीमंत घरातील आरोपी गजाआड, देशातील पहिले उदाहरण, आयुक्तांची माहिती

पुणे : कल्याणीनगर येथील गाजलेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणात आरोपीच्या ‘डीएनए’साठी घेतलेल्या सेकंड ब्लड सॅम्पलमुळे तब्बल १९ महिन्यांनंतरही आरोपीचे नातेवाईक व संबंधित डॉक्टर गजाआड आहेत. अपघात प्रकरणात इतका दीर्घकाळ आरोपींना जामीन न मिळण्याचे हे देशातील पहिले उदाहरण असल्याचा दावा पोलिसआयुक्त अमितेश कुमार यांनी केला. मे २०२४ मध्ये मद्यधुंद अवस्थेत अल्पवयीन मुलाने पोर्शे कार चालवून दुचाकीवरील तरुण-तरुणीला धडक दिली होती. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात एकूण नऊ आरोपी असून, त्यांच्या जामीन अर्जांना नुकताच उच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

पोलिसआयुक्तांनी सांगितले की, आरोपीचे दोन रक्त नमुने घेतल्यावर सुरुवातीला पोलिसांवर टीका झाली होती. मात्र, हाच सेकंड ब्लड सॅम्पल तपासासाठी निर्णायक ठरले. रक्ताचे नमुने बदलल्याचे उघड झाले नसते, तर आरोपींना आतापर्यंत जामीन मिळाला असता. मूळ वाहनचालकाचे अपहरण करून दबाव टाकल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले.

या खटल्यात आतापर्यंत जिल्हा न्यायालय व उच्च न्यायालयात १७४ वेळा सुनावणी झाली आहे. तरीही भक्कम पुरावे व योग्य तपासामुळे जामीन मिळू शकलेला नाही. उद्योजक विशाल अग्रवाल यांच्यासह अरुणकुमार सिंग, आशिष मित्तल, आदित्य सूद, अश्पाक मकंदर, ससून रुग्णालयातील डॉ. अजय तावरे व अन्य आरोपी अद्याप गजाआड आहेत. आरोपीच्या आईला १६ महिन्यांनंतर जामीन मिळाला आहे.

‘तुम्ही कितीही श्रीमंत असलात, तरी आपत्तीजनक कृत्य केल्यास जेलमध्येच जागा आहे,’ हा संदेश पुणे पोलिसांनी कृतीतून दिल्याचे अमितेश कुमार म्हणाले. निष्पाप मृतांना न्याय देण्यासाठी पोलिसांनी केवळ गुन्ह्यांची नोंद न करता सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे, या प्रकरणातून स्पष्ट झाल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title : पुणे पोर्श दुर्घटना: दूसरे नमूने से 19 महीने से अमीर आरोपी जेल में

Web Summary : पुणे पोर्श दुर्घटना में, दूसरे खून के नमूने से आरोपी और सहयोगी 19 महीने से जेल में हैं। यह अभूतपूर्व मामला धन की परवाह किए बिना न्याय सुनिश्चित करने के पुलिस प्रयासों पर प्रकाश डालता है, जिसमें सभी नौ आरोपियों को अब तक जमानत नहीं मिली है।

Web Title : Pune Porsche Crash: Second Sample Jailed Rich Accused for 19 Months

Web Summary : In Pune's Porsche crash, a second blood sample kept the accused and accomplices jailed for 19 months. This unprecedented case highlights police efforts to ensure justice, regardless of wealth, with all nine accused denied bail so far.