शहरं
Join us  
Trending Stories
1
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
2
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
3
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
4
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
5
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
7
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
8
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
9
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
10
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
11
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
12
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
13
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
14
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
15
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
16
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
17
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
18
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
19
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
20
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपींना युएपीए कायदा लागणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2018 8:10 PM

२० आॅगस्ट २०१३ रोजी सकाळी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करण्यात आली होती. हत्येच्या आरोपावरून सुरुवातील मनीष नागोरी आणि खंडेलवाल यांना अटक करण्यात आली होती.

ठळक मुद्देसीबीआयकडून न्यायालयात अर्ज पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढीची मागणी आरोपींच्या विरोधात पुरावे शोधण्याचे आव्हान सीबीआयपुढे युएपीएच्या मागे राजकीय कारण असून या खटल्याची सुनावणी सुरू होण्यास मुद्दाम उशीर

पुणे : अंधश्रध्दा निमूर्लन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात बेकायदा प्रतिबंधक हालचालीचे कलम (युएपीए) वाढविण्यात यावे, असा अर्ज केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआयने) न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.     नव्याने अटक करण्यात आलेल्या आरोपींवर पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यासाठीही सीबीआयने न्यायालयाकडे मुदतवाढीची मागणी केली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एम. ए. सय्यद यांच्या न्यायालयात याबाबत अर्ज दाखल करण्यात आले आहेत. २० आॅगस्ट २०१३ रोजी सकाळी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करण्यात आली होती. हत्येच्या आरोपावरून सुरुवातील मनीष नागोरी आणि खंडेलवाल यांना अटक करण्यात आली होती. परंतु, त्यांचा गुन्ह्यात सहभाग निष्पन्न न झाल्याने त्यांच्या विरोधात आरोपपत्रही दाखल झाले नाही. गुन्ह्याचा तपास सीबीआयकडे गेल्यानंतर सीबीआयने सनातचा साधक डॉ. विरेंद्रसिंह तावडे याला अटक करून आरोपपत्र दाखल केले होते. तावडे हा याप्रकरणील मुख्य सुत्रधार असल्याचा दावा त्यात करण्यात आला होता.   तपास सुरू असताना सीबीआयने आॅगस्ट महिन्यात सचिन अंदुरे, अमित दिगवेकर, राजेश बंगेरा आणि अमोल काळे यांना अटक केली होती. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या कट कोणी रचला, त्यांच्यावर कोणी गोळ्या झाडल्या, शस्त्र कोणी पुरवे, ठिकाणाची रेकी कोणी केली, आरोपींना पळून जाण्यास कोणी मदत केली, अशी तपासाची पुर्ण थेअरी आता स्पष्ट झाली आहे.त्यानुसार आरोपींच्या विरोधात पुरावे शोधण्याचे आव्हान सीबीआयपुढे आहे. तपासादरम्यान हाती आलेल्या बाबींच्या अनुषांगाने आरोपींकडे तपास करण्यात येत आहे. दरम्यान याप्रकरणात युएपीएचे कलम अंतर्भूत करण्यासाठी व पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यासाठी न्यायालयाकडे मुदत मागण्यात आली आहे. ............................ सीबीआयने डॉ. दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात युएपीएचे कलम १५ अंतर्भूत करण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आहे. युएपीएच्या मागे राजकीय कारण असून या खटल्याची सुनावणी सुरू होण्यास मुद्दाम उशीर करण्यात येत आहे. खटला रोज चालल्यास मतदानावरही याचा परिणाम होईल, अशी शासनाला भिती आहे. त्यामुळे अशा पध्दतीने कारवाई केली जात आहे.  अ‍ॅड. धर्मराज चंडेल, बचाव पक्षाचे वकील.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसCBIगुन्हा अन्वेषण विभागArrestअटकNarendra Dabholkarनरेंद्र दाभोलकर