शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

Pune: पोलीस भरती दरम्यान धावताना तरुणाला 'फिट'; मैदानात बेशुद्ध होऊन मृत्यू, शिवाजीनगर मुख्यालयातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 15:25 IST

भरती प्रक्रियेतील १६०० मीटर धावण्याची चाचणी ही कठीण मानली जाते. तरुणाने मैदानाला दोन फेऱ्या मारल्या, तिसऱ्या फेरीत अचानक फिट आली

पुणे: पोलिस भरती दरम्यान मैदानी चाचणीत धावताना एका २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शिवाजीनगर पोलिस मुख्यालयातील मैदानावर शनिवारी (दि. २८) सकाळी घडली. १६०० मीटर धावण्याची चाचणी देत असताना अचानक त्याला ‘फिट’ आली. मैदानात बेशुद्ध होऊन कोसळल्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.

पुरुषोत्तम बारकुल (वय २३, रा. देऊळगाव राजा, जि. बुलढाणा) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. पुणे शहर दलातील भरती प्रक्रिया गेल्या महिन्याभरापासून सुरू आहे. शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यालयातील मैदानावर मैदानी चाचणी घेण्यात येत आहे. शनिवारी सकाळी मैदानी चाचणी सुरू झाली. पुरुषोत्तम बारकुल हा मैदानी चाचणीत सहभागी झाला. भरती प्रक्रियेतील १६०० मीटर धावण्याची चाचणी ही कठीण मानली जाते. पुरुषोत्तम याने मैदानाला दोन फेऱ्या मारल्या, तिसऱ्या फेरीत अचानक त्याला फिट आली. तो धावताना मैदानावरच कोसळला. त्याच्याबरोबर असलेल्या उमेदावारांसह, भरती प्रक्रियेतीली अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या लक्षात हा प्रकार आला. मैदानावर उपस्थित असलेल्या वैद्यकीय पथकाने त्याची प्राथमिक तपासणी केली. त्याच्या हृदयाचे ठोके मंद झाल्याचे निदर्शनास आले. त्याला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारापूर्वीच तो मरण पावल्याचे ससूनमधील वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.

पुरुषोतत्म बारकुल याने भरती प्रक्रियेसाठी चांगली तयारी केली होती. मूळचा बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजाचा रहिवासी असलेल्या पुरुषोत्तम याचा भरती प्रक्रियेत धावताना मृत्यू झाल्यानंतर हळहळ व्यक्त करण्यात आली. याबाबतची माहिती त्याच्या कुटुंबीयांना पोलिस अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर शोकाकुल कुटुंबिय पुण्याकडे रवाना झाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune: Youth Dies During Police Recruitment Run, Collapses on Field

Web Summary : A 23-year-old man died during a police recruitment run in Pune after collapsing on the field. He suffered a fit during the 1600-meter race and was rushed to the hospital, where he was declared dead before treatment. He hailed from Buldhana district.
टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसStudentविद्यार्थीEducationशिक्षणHeart Attackहृदयविकाराचा झटकाexamपरीक्षाMaharashtraमहाराष्ट्रHealthआरोग्य