शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! प्रेयसीचा खून करून तरुणाची आत्महत्या; हडपसर भागातील हाॅटेलमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2024 11:15 IST

हडपसर भागातील एका हाॅटेलमध्ये ही घटना घडली.....

पुणे : नातेसंबंधातील प्रेमप्रकरणाला विरोध करण्यात आल्याने गावाहून पळून आलेल्या तरुणाने प्रेयसीचा खून करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. हडपसर भागातील एका हाॅटेलमध्ये ही घटना घडली.

मोनिका कैलास खंडारे (२४) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. तिचा चादरीने गळा आवळून खून करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तिचा खून करून प्रियकर आकाश अरुण खंडारे (३०) याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलिस निरीक्षक उमेश राेकडे यांनी फिर्याद दिली आहे.

मोनिका आणि आकाश मूळचे अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात असलेल्या कसुरा गावचे रहिवासी होते. दोघे नातेवाईक असून, त्याचे प्रेमसंबंध होते. मोनिका आणि आकाशच्या प्रेमसंबंधाला कुटुंबीयांचा विरोध होता. आकाश शेती करायचा. मोनिका नोकरी करत होती. त्यांच्या प्रेमप्रकरणाला विरोध होत असल्याने त्यांनी यापूर्वी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. दोघे जण गावाहून पळून पुण्यात आले होते. हडपसर भागातील मांजरी-मुंढवा रस्त्यावर असलेल्या स्पाॅटलाईट हाॅटेलमध्ये दोघांनी खोली भाड्याने घेतली होती. १३ मे रोजी मध्यरात्री आकाशने मोनिकाचा चादरीने गळा आवळून खून केला. त्यानंतर त्याने खोलीतील पंख्याला चादर बांधून गळफास घेतला. दोघे जण मृतावस्थेत सापडल्याची माहिती हाॅटेलमधील कर्मचाऱ्यांनी पोलिसांना दिली. सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी राख, हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पांढरे, गुन्हे शाखेचे निरीक्षक उमेश गिते यांनी घटनास्थळी भेट दिली.

पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिसांनी कुटुंबीयांची चौकशी करण्यात आली. मोनिका आणि आकाशचे प्रेमसंबंध होते. दोघेही नात्यातील आहेत. प्रेमसंबंधाला विरोध केल्याने दोघे जण पुण्यात पळून आले होते. नातेसंबंधातील प्रेमप्रकरणाला विरोध केल्याने त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिस निरीक्षक गिते पुढील तपास करत आहेत.

टॅग्स :HadapsarहडपसरCrime Newsगुन्हेगारीPuneपुणे