सोसायटीच्या रस्त्यावर शतपावली करताना महिलेची ७० हजारांची सोनसाखळी हिसकावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 17:02 IST2026-05-12T17:01:46+5:302026-05-12T17:02:38+5:30

रात्री पावणेदहाच्या सुमारास त्या जेवण करुन मैत्रिणीसोबत शतपावली करण्यासाठी निघाल्या असताना ही घटना घडली आहे

A woman's gold chain worth Rs 70,000 was snatched while she was performing Shatapawali on the road of the society. | सोसायटीच्या रस्त्यावर शतपावली करताना महिलेची ७० हजारांची सोनसाखळी हिसकावली

सोसायटीच्या रस्त्यावर शतपावली करताना महिलेची ७० हजारांची सोनसाखळी हिसकावली

पुणे : जेवण केल्यानंतर शतपावली करण्याची अनेकांना सवय असते. पण रात्री सोसायटीतील रस्त्यावर शतपावली करणे महिलेला चांगलेच महागात पडले. मैत्रिणीसमवेत शतपावली करण्यासाठी निघालेल्या महिलेच्या गळ्यातील ७० हजारांची सोनसाखळी हिसकावून नेली. ही घटना बिबवेवाडी भागात घडली. या प्रकरणी दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत एका महिलेने बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ४१ वर्षीय महिला बिबवेवाडीतील एका सोसायटीत राहायला आहेत. रविवारी (१० मे) रात्री पावणेदहाच्या सुमारास त्या जेवण करुन मैत्रिणीसोबत शतपावली करण्यासाठी निघाल्या. लोकेश सोसायटीतील रस्त्यावर दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील ७० हजारांची सोनसाखळी हिसकावून नेली. महिलेने आरडाओरडा केला. चोरटे दुचाकीवरुन पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तेथे धाव घेतली. पोलिसांनी साेसायटीच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, पसार झालेल्या चोरट्याचा शोध घेण्यात येत आहे. पोलिस उपनिरीक्षक कांबळे तपास करत आहेत.

Web Title : पुणे: सोसाइटी में टहलते समय महिला की सोने की चेन लूटी गई।

Web Summary : पुणे के बिबवेवाड़ी में एक महिला मित्र के साथ टहल रही थी, तभी बाइक सवार चोरों ने 70,000 रुपये की सोने की चेन छीन ली। पुलिस सीसीटीवी फुटेज की जांच कर रही है और अपराधियों की तलाश कर रही है।

Web Title : Pune: Woman's gold chain snatched during evening walk in society.

Web Summary : In Bibvewadi, Pune, a woman lost her 70,000-rupee gold chain to bike-borne thieves while walking with a friend. Police are investigating the CCTV footage and searching for the culprits.