नीरा : नीरा नजिकच्या पिंपरे खुर्द (ता. पुरंदर) गावच्या हद्दीतील जेऊर रेल्वे अंडरपास शेजारी पुणे–मिरजरेल्वे मार्गावर भरधाव रेल्वेची धडक बसून एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि.२५) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. पुणे–मिरज रेल्वे मार्गावर पुणे बाजूकडून सातारा दिशेने जाणाऱ्या भरधाव रेल्वेची धडक बसून एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. धडकेची तीव्रता इतकी प्रचंड होती की युवकाच्या शरीराचे तुकडे तुकडे होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती सर्वप्रथम संबंधित रेल्वेच्या लोको पायलटने रेल्वे विभागाला दिली. त्यानंतर रेल्वे प्रशासनामार्फत नीरा पोलिसांना याबाबत कळविण्यात आले. माहिती मिळताच नीरा पोलीस दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक घनश्याम चव्हाण व हवालदार संतोष मदने यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व मृतदेह ताब्यात घेतला.
मृतदेहाची ओळख पटवणे अवघड असतानाच घटनास्थळी आढळलेल्या मोबाईलच्या आधारे तपास करण्यात आला. मोबाईल तपासणीतून सदर युवकाचे नाव पोलीसांनी निष्पन्न केले. सतीश गुलाब रोकडे (वय ४५, रा. वीर, ता.) असे या व्यक्तीचे नाव आहे. जेजुरी येथील ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर वीर येथील नातेवाईकांनी ताब्यात घेऊन रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून पुढील तपास नीरा पोलीस करत आहेत. मृत्यू अपघाती की अन्य कारणामुळे झाला, याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.
Web Summary : Near Nira, a 45-year-old man, Satish Rokade, died instantly after being hit by a speeding train. The impact dismembered his body. Police identified him via his mobile phone and are investigating the cause.
Web Summary : नीरा के पास, 45 वर्षीय सतीश रोकडे की तेज रफ्तार ट्रेन की चपेट में आने से मौके पर ही मौत हो गई। टक्कर से उसके शरीर के टुकड़े-टुकड़े हो गए। पुलिस ने उसके मोबाइल फोन से उसकी पहचान की और कारण की जांच कर रही है।