शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 23:38 IST

SIR In Uttar Pradesh: सध्या उत्तर प्रदेशमध्ये सुरू असलेल्या एसआयआर बाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशमध्ये एसआयआरच्या प्रक्रियेनुसार मतदार यादीमधून तब्बल २ कोटी ८९ लाख मतदारांची नावं वगळली जाणार आहेत.

सध्या उत्तर प्रदेशमध्ये सुरू असलेल्या एसआयआर बाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशमध्ये एसआयआरच्या प्रक्रियेनुसार मतदार यादीमधून तब्बल २ कोटी ८९ लाख मतदारांची नावं वगळली जाणार आहेत. तर सुमारे १.१ कोटी लोकांना नोटिस पाठवली जाणार आहे. या लोकांना निवडणूक आयोगाकडे आपली कागदपत्रे सोपवावी लागतील. उत्तर प्रदेशमध्ये एसआयआरचे अर्ज दाखल करण्याची मुदत शुक्रवार २६ डिसेंबर रोजी रात्री १२ पर्यंत आहे. तर ३१ डिसेंबर रोजी मतदार यादी प्रसिद्ध होईल. उत्तर प्रदेशमध्ये  ११ डिसेंबरपर्यंत २.९१ कोटी मतदारांनी आपले एसआयआर अर्ज जमा केले नव्हते. त्यानंतर मुदत वाढवल्यानंतरही १५ दिवसांमध्ये केवळ १० लाख मतदारांनीच आपले अर्ज जमा केले आहेत. दरम्यान, ३१ डिसेंबर नंतर १.११ कोटी लोकांना कागदपत्रं सादर करण्यासाठी नोटिस पाठवली जाणार आहे. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात अंतिम मतदार यादी प्रकाशित केली जाईल.

एसआयआर प्रक्रियेंतर्गत उत्तर प्रदेशमधून ज्या २.८ कोटी मतदारांची नावं वगळली जाणार आहेत. त्यामधील सुमारे १.२६ कोटी मतदार हे स्थलांतरित झालेले आहेत. ४६ लाख मतदारांचा मृत्यू झाला आहे. त्याशिवाय तब्बल २३.७० लाख दुबार मतदार होते. तसेच तब्बल ८३.७३ लाख मतदार अनुपस्थित असल्याचे निदर्शनास आले. तसेच इतर कारणांमुळे ९.५७ लाख मतदारांची नावंही वगळली जाणार आहेत.

या प्रक्रियेदरम्यान, सुमारे १.११ कोटी मतदारांना नोटिस बजावली जाईल. तसेच वैध कागदपत्रे दाखवल्यानंतर त्यांना मतदार बनता येणार आहे. एसआयआरच्या यादीबाबत ३१ डिसेंबरपासून ३० जानेवारीपर्यंत दावे आणि आक्षेप नोंदवता येणार आहेत.  तसेच ३१ डिसेंबरपासून २१ फेब्रुवारीपर्यंत नोटिशीच्या टप्प्यात दावे आणि आक्षेपांचं निराकरण होणार आहे. त्यानंतर २८ फेब्रुवारी रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.  

English
हिंदी सारांश
Web Title : Uttar Pradesh to Delete 2.89 Crore Voters; SIR Data Shock

Web Summary : Uttar Pradesh will remove 2.89 crore voters from the rolls due to the SIR process. 1.1 crore will get notices to submit documents. Reasons include migration, deaths, duplicates, and absence. Final voter list publishes in February.
टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगUttar Pradeshउत्तर प्रदेश