शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 19:18 IST

Pradhan Mantri Rashtriya Bal Puraskar: वडिलांना मगरीच्या जबड्यातून खेचून आणणाऱ्या उत्तर प्रदेशातील अजयराज चहर या बालकाच्या अचाट धैर्याची कहाणी!

वडिलांना मगरीच्या जबड्यातून खेचून आणणाऱ्या उत्तर प्रदेशातील अजयराज चहर या बालकाच्या अचाट धैर्याची दखल घेत भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज त्याचा राष्ट्रपती भवनात विशेष सन्मान केला. अजयराजला राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान मिळाल्याची बातमी समजताच झारणापुरा हरलालपूर गावात उत्सवाचे वातावरण निर्माण झाली. अजयराज फक्त त्याच्या वडिलांनाच मगरीपासून वाचवले नाही तर, आमच्या गावालाही सन्मान मिळून दिला, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

ही घटना जुलै २०२५ मधील आहे. आग्रा जिल्ह्यातील झारणापुरा हरलालपूर येथील शेतकरी वीरभान चहर हे आग्रा-धोलपूर सीमेवरील चंबळ नदीवर पाणी आणण्यासाठी गेले होते. त्यांचा मुलगा अजयराजही त्यांच्यासोबत होता. वीरभान नदीकाठी असताना अचानक पाण्यात दबा धरून बसलेल्या एका मगरीने त्यांचा पाय जबड्यात धरला आणि त्यांना खोल पाण्याकडे ओढू लागली. वडिलांचा ओरडण्याचा आवाज ऐकताच अजयराज तिथे धावून आला. वडिलांचा पाय मगरीच्या जबड्यात पाहून तो डगमगला नाही.  त्याने क्षणाचाही विलंब न लावता जवळच पडलेली बाभळीची एक जाड काठी उचलली आणि मगरीवर तुटून पडला. मगरीच्या डोळ्यावर आणि तोंडावर त्याने जोरदार प्रहार केले. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे मगर बिथरली आणि तिने वीरभान यांना सोडून पाण्यात पळ काढला. 

मगरीच्या हल्ल्यात वीरभान गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जवळच्या आरोग्य केंद्रात आणि नंतर आग्रा येथील रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांच्या मते, अजयराजने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे आणि वेळेवर मिळालेल्या उपचारांमुळे वीरभान यांचे प्राण वाचू शकले. अजयराजच्या या शौर्याची वार्ता राज्यभर पसरली आणि अखेर त्याची दखल केंद्र सरकारने घेतली. आज राष्ट्रपती भवनात आयोजित एका विशेष समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अजयराजला सन्मानित केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Boy Saves Father From Crocodile, Honored by Indian President

Web Summary : A brave boy, Ajayraj, saved his father from a crocodile's jaws in Uttar Pradesh. He fought off the reptile with a stick. President Murmu honored him for his courage. The village celebrated Ajayraj's bravery and recognition.