शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 21:22 IST

Syria Mosque Blast: सुरक्षा दलांनी मशिदीसह परिसराला वेढा घातला आहे.

Syria Mosque Blast: सीरियामध्ये मोठा हल्ला झाला आहे. होम्समधील एका मशिदीला लक्ष्य करण्यात आले आहे. या स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाला आहे आणि १८ जण जखमी झाले आहेत. मशिदीत स्फोटके लावण्यात आली असल्याचे वृत्त आहे. सुरक्षा दलांनी मशिदीसह परिसराला वेढा घातला आहे. बंडखोरांच्या ताब्यातील उत्तर ग्रामीण भागात नमाज पठाणदरम्यान हा स्फोट झाला.

सीरियन अरब न्यूज एजन्सीनुसार, मध्य सीरियातील होम्समधील वाडी अल-दहाब जिल्ह्यातील इमाम अली इब्न अबी तालिब मशिदीत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, या स्फोटात १८ जण जखमी झाले आहेत. जखमींना होम्समधील करम अल-लुज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मशिदीभोवतीची सुरक्षा वाढवली

गृह मंत्रालयाचे म्हणणे आहे की अंतर्गत सुरक्षा युनिट्स घटनास्थळी तात्काळ तैनात करण्यात आले आहेत. मशिदीभोवतीची सुरक्षा कडक करण्यात आली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली आहे आणि हल्लेखोरांची ओळख पटवण्यासाठी पुरावे गोळा करत आहेत. सुरुवातीच्या तपासात असे दिसून आले आहे की हा स्फोट मशिदीत लावलेल्या स्फोटक उपकरणांमुळे झाला आहे. मात्र अधिक तपास सुरु आहे.

गृह मंत्रालयाने हल्ल्याबद्दल काय म्हटले?

मंत्रालयाने म्हटले आहे की हे स्फोट म्हणजे मानवी आणि नैतिक मूल्यांवर हल्ला आहेत. या हल्ल्यांमध्ये सहभागी असलेल्यांना जबाबदार धरले जाईल. आम्ही सुरक्षा मजबूत करण्यासाठी आणि नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहोत. गृह मंत्रालयाने म्हटले आहे की स्फोटात अली बिन अबी तालिब मशिदीला लक्ष्य करण्यात आले होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Syria: Mosque blast during prayers kills eight, injures eighteen.

Web Summary : A devastating explosion targeted a mosque in Homs, Syria, during prayers. The attack resulted in eight fatalities and eighteen injuries. Authorities suspect explosives were planted inside the mosque. Security forces have cordoned off the area and launched an investigation to identify the perpetrators.
टॅग्स :MosqueमशिदSyriaसीरिया