हद्द झाली! वासनांध नराधमाचा कुत्र्यावर अत्याचार! पुण्यात नेमकं घडतंय काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 20:11 IST2025-04-11T20:05:25+5:302025-04-11T20:11:23+5:30

एका विकृत माणसाकडून कुत्र्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे

A man who is obsessed with lust and abuses a dog What is really happening in Pune? | हद्द झाली! वासनांध नराधमाचा कुत्र्यावर अत्याचार! पुण्यात नेमकं घडतंय काय?

हद्द झाली! वासनांध नराधमाचा कुत्र्यावर अत्याचार! पुण्यात नेमकं घडतंय काय?

किरण शिंदे 

पुणे : पुण्याच्या हडपसर परिसरात माणुसकीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका विकृत माणसाकडून कुत्र्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी काळेपडळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव हलीमुद्दीन शेख असून तो मूळचा पश्चिम बंगालचा रहिवासी आहे. सध्या तो हडपसरमधील हांडेवाडी परिसरात वास्तव्यास आहे. कुत्र्याचा मालक काही कामानिमित्त घराबाहेर गेला असता ही घटना घडली. घरी परतल्यानंतर कुत्र्याच्या वागणुकीमध्ये अचानक बदल जाणवू लागल्याने मालकाला शंका आली. त्यानंतर त्याने घरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता हा संपूर्ण अमानवी प्रकार उघडकीस आला. या प्रकाराने परिसरात संतापाची लाट पसरली आहे. सदर घटनेची माहिती शिवसेना (शिंदे गट) चे पदाधिकारी राजेश पळसकर यांच्यासह इतर स्थानिक नागरिकांना देण्यात आली. त्यांनी तत्काळ यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी कारवाई करत आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

Web Title: A man who is obsessed with lust and abuses a dog What is really happening in Pune?