शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

६० हजारांवर मराठ्यांची उपस्थिती

By admin | Updated: September 26, 2016 01:33 IST

पुण्यातील मराठा मूक मोर्चासाठी सुमारे ६० हजारांपेक्षा मराठ्यांची उपस्थिती असल्याचा दावा संयोजकांनी केला आहे. मोर्चात जास्तीत जास्त पुरंदर तालुक्याचा सहभाग

जेजुरी : पुण्यातील मराठा मूक मोर्चासाठी सुमारे ६० हजारांपेक्षा मराठ्यांची उपस्थिती असल्याचा दावा संयोजकांनी केला आहे. मोर्चात जास्तीत जास्त पुरंदर तालुक्याचा सहभाग राहावा म्हणून तालुक्यातील संयोजक गेले १५ दिवसांपासून नियोजन करीत होते. सासवड, जेजुरी या प्रमुख शहराव्यातिरिक्त गावागावांतून मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत होते. त्याला गावागावांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता. तालुक्यातील अनेक मराठा समाजबांधवांनी कालपासूनच पुण्यात जायला सुरुवात केली होती. आज सकाळी ६ वाजतापासून जेजुरी-सासवड येथून मराठाबांधव पुण्याकडे कूच करीत होते. सासवड येथून मोर्चात सहभागी होणाऱ्या मराठाबांधवांसाठी संयोजकांनी ४० एसटी बस, ३० पीएमटी बस, २५ खासगी बस, १० ट्रक, ४०० जीपगाड्या आणि सुमारे ८००० दुचाकींच्या अधिकृत नोंदी केलेल्या होत्या. याशिवाय तालुक्यातील प्रत्येक गावातून उत्स्फूर्तपणे मराठाबांधव मोर्चात सहभागी होण्यासाठी गेला होता. पुरंदर तालुक्यातील समाजबांधवांसाठी पुण्यातील गुलटेकडी, मार्केट यार्ड परिसरात वाहने पार्क करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती.पुरंदरकरांनी हा संपूर्ण परिसर व्यापून टाकला होता. तालुक्यतील शाळा-महाविद्यालयांतील युवक-युवतींची मोठी संख्या दिसत होती. मोर्चाचा प्रारंभ करण्यासाठी डेक्कन येथील संभाजीमहाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालणे आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी जिल्ह्यातून १५ भगिनींची निवड केली होती.इंदापूरमधून ८० बस; दोन हजार चारचाकीइंदापूर : पुणे शहरात झालेल्या मराठा क्रांती मूक मोर्चासाठी इंदापूर तालुक्यातून सुमारे ७० हजार जण गेले होते. एसटी बसने जाणाऱ्यांबरोबरच ८० बस आणि दोन हजार चारचाकी वाहनांतून लोक मोर्चाला गेले होते, अशी माहिती तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष शेखर पाटील यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.ते म्हणाले, की राजकीय पक्ष, संघटना, आपसातील मतभेद बाजूला ठेवून मराठा समाजाच्या मागण्यांसाठी सर्व जण एकत्र आले होते. तालुक्यातील प्रत्येक गावातून किमान दहा गाड्या निघाल्या होत्या. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील सरडेवाडी टोलनाक्यावरून ४० हजार गाड्या गेल्याची नोंद आहे. मराठा समाजाच्या रास्त मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी अनेक नागरिक मोर्चात सामील झाले होते.