शहरं
Join us  
Trending Stories
1
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
2
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
3
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
4
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
5
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
6
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
7
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
8
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
9
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
10
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
11
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
12
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
13
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
14
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
15
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
16
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
17
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
18
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
19
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या ५८ हजार जागा रिक्त

By admin | Updated: July 4, 2014 06:36 IST

बारावीचा निकाल वाढल्यामुळे राज्यातील अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या जागांवर प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होईल, अशी शक्यता शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींकडून व्यक्त केली जात होती.

पुणे : बारावीचा निकाल वाढल्यामुळे राज्यातील अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या जागांवर प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होईल, अशी शक्यता शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींकडून व्यक्त केली जात होती. परंतु, गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या तब्बल ५८ हजार जागा रिक्त राहणार आहेत. परिणामी, राज्यातील अनेक महाविद्यालयांना या वर्षीही विद्यार्थी मिळणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.गेल्या काही वर्षांपासून राज्यात अभियांत्रिकी महाविद्यालयांची संख्या वाढत चालली आहे. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या हजारो जागा रिक्त राहत असल्याने राज्य शासनाने खुल्या प्रवर्गात ४५ टक्के गुण मिळवणाऱ्या आणि मागासवर्गीय प्रवर्गात ४० टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, तरीही जागा रिक्त राहत होत्या. परंतु, गुणवत्तेच्या कारणास्तव यंदा प्रवेशासाठी ४५/५० टक्के गुणांची अट लागू करण्यात आली. तसेच, राज्य शासनाने यंदा प्रथमच जेईई परीक्षेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यात इयत्ता बारावीचा निकाल वाढला. त्यामुळे अभियांत्रिकी अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. राज्याच्या तंत्र शिक्षण संचालनालयाच्या (डीटीई) अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचा आॅनलाईन प्रवेश अर्ज भरण्याचा गुरुवारी शेवटचा दिवस होता, तर बुधवारी (दि. २) अभियांत्रिकी प्रवेश अर्जाचे किट विक्री करण्याचा अंतिम दिवस होता. बुधवारी १ लाख १२ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेशाचे किट विकत घेतले, तर गुरुवारी राज्यातील केवळ १ लाख ६ हजार ६०० विद्यार्थ्यांनी आॅनलाईन प्रवेश अर्ज भरला. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या सर्वसाधारणपणे १ लाख ६५ हजार जागा उपलब्ध आहेत. त्यामुळे तब्बल ५८ हजार जागा रिक्त राहणार आहेत.गेल्या वर्षी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या एकूण १ लाख ६२ हजार १५९ जागांवर १ लाख ७ हजार ५४५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. त्यामुळे ५४ हजार ६१४ जागा रिक्त राहिल्या होत्या. यंदा राज्यात सर्वसाधारणपणे १ लाख ६५ हजार जागा उलब्ध असून, त्यात काही प्रमाणात वाढ होऊ शकते. परंतु, उपलब्ध प्रवेश क्षमतेपेक्षाच्या तुलनेत प्रवेश अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याने गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही ५८ हजार जागा रिक्त राहणार आहेत. (प्रतिनिधी)