शहरं
Join us  
Trending Stories
1
नीट पेपरफुटीचा भंडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
2
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
3
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
4
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
5
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
6
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
7
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
8
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
9
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
10
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
11
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
12
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
13
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
14
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
15
नालेसफाईच्या ठेक्यात १५ टक्के लाचेची मागणी; एपीएमसी उपसचिव अडकला एसीबीच्या जाळ्यात
16
महाविद्यालयात किती रिक्त जागा; आज कळणार , अकरावी प्रवेश प्रक्रियेचा पुढील टप्पा २१ मेपासून 
17
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण; याचिकेवर सुनावणीस सुप्रीम कोर्टाचा नकार
18
‘डीसीजीए’ विमान इंधन स्वीचची  ‘बोईंग’मध्ये करणार चौकशी; पथक लवकरच अमेरिकेत जाऊन तपास करणार
19
भटके कुत्रे : सुप्रीम कोर्टाने आपली जबाबदारी झटकली; मनेका गांधींचा आरोप, पूर्वीचे आदेशच सांगितले
20
राखीव प्रवर्गांबाबतच्या ‘त्या’ निर्णयाला स्थगिती, मंत्रिमंडळाचा निर्णय : महाधिवक्त्यांचे मत घेणार
Daily Top 2Weekly Top 5

रिंगरोडसाठी ४७ हेक्टर वनजमिनीची आवश्यकता; PMRDA कडून वन विभागाकडे ऑनलाईन प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2023 11:28 IST

६५ मीटर रुंद रिंगरोड प्रकल्पासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल व भूसंपादन प्रस्ताव सल्लागारामार्फत तयार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे...

- नारायण बडगुजर

पिंपरी :पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) हद्दीतील वर्तुळाकार रस्त्यासाठी (रिंगरोड) ४७ हेक्टर वनजमिनीची आवश्यकता आहे. त्यासाठी वनविभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्यावर पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी वनविभागाने केली आहे.  

पीएमआरडीएच्या ११० मीटर रुंद वर्तुळाकार रस्त्याच्या (रिंगरोड) १२८.८ किलोमीटर लांबीपैकी मावळ तालुक्यातील परंदवाडी ते चेड तालुक्यातील सोळू हा ४० किलोमीटश्र लांबीचा रिंगरोड महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळास विकसनासाठी हस्तांतर करण्यात आला आहे. प्राधिकरणाकडील उर्वरित लांबीसाठी रस्त्याची रुंदी ६५ मीटर करण्याचा प्रस्ताव शासनास सादर केला होता. त्याला अनुसरुन महाराष्ट्र शासनाची नगररचना अधिनियमानुसार कलम २०(३) ची अधिसूचना १८ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रसिद्ध झाली आहे. त्यावर पुण्यातील नगररचना विभागामार्फत पुढील कार्यवाही  सुरू आहे. त्याप्रमाणे पीएमआरडीएच्या ऑगस्ट २०२१ मधील प्रसिद्ध प्रारुप विकास आराखड्यात पीएमआरडीएकडील रिंगरोडची रुंदी ६५ मीटर दर्शविण्यात आली आहे.

६५ मीटर रुंद रिंगरोड प्रकल्पासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल व भूसंपादन प्रस्ताव सल्लागारामार्फत तयार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. पहिल्या टप्प्यासाठी सोलू, निरगुडी व वडगाव शिंदे या तीन गावांचे भूसंपादन प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्यात आले आहेत. तथापि ६५ मीटर रुंदीच्या संपूर्ण ८८.८ किलोमीटरच्या रिंगरोडसाठी आवश्यक ४६.८३६३ हेक्टर वनजमीन संपादनाचा प्रस्ताव वनविभागाच्या परिवेष या पोर्टलवर ३१ मे २०२३ रोजी अपलोड करण्यात आला आहे. हा प्रस्ताव उपवनसंरक्षक, पुणे वन विभाग यांच्याकडे २ जून रोजी सादर करण्यात आला.

भूसंपादन अधिकाऱ्याची होणार नियुक्ती

पीएमआरडीएकडून भूसंपादन प्रस्ताव सादर करण्यात आला असून त्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडून त्यासाठी स्वतंत्र अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहे. उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याला नियुक्त करून भूसंपादन प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या आठवड्यात अधिकारी नियुक्त होऊन प्रक्रिया सुरू होईल, असे पीएमआरडीए प्रशासनाकडून सांगय्यात येत आहे.

संपादित करायच्या ४७ हेक्टर वनजमिनीसाठी पर्यायी वनेतर क्षेत्र देण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयास विनंती केली आहे. त्यानुसार पर्यायी जागेचा तपशील उपलब्ध झाल्यावर वनविभागासाठी चर्चा करून पर्यायी जागा देण्यात येईल.

- रामदास जगताप, उप जिल्हाधिकारी तथा जन संपर्क अधिकारी, पीएमआरडीए

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPMRDAपीएमआरडीए