शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीतून ४० उमेदवारांचे अर्ज

By admin | Updated: September 29, 2014 05:52 IST

विधानसभा मतदार संघात एकुण ४० उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. शनिवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी दुपारी ३ वाजेपर्यंत २५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले.

पिंपरी : विधानसभा मतदार संघात एकुण ४० उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. शनिवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी दुपारी ३ वाजेपर्यंत २५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. प्राधिकरणातील डॉ.हेडगेवार भवन येथे पिपिरी विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक कार्यालयात दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे काम सुरू होते.राष्ट्रवादी काँग्रेसमार्फत आमदार अण्णा बनसोडे,शिवसेनेच्यावतीने गौतम चाबुकस्वार,काँग्रेसतर्फे मनोज कांबळे, आरपीआय (आठवले गट) तर्फे चंद्रकांता सोनकांबळे, बहुजन समाज पक्षातर्फे क्षितीज गायकवाड,मनसेतर्फे अनिता सोनवणे,प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टीचे अ‍ॅड सुनील माने,बहुजन मित्र सेना नागनाथ दाखले, जनता दलातर्फे डॉ. भास्कर बच्छाव,नॅशनॅलिस्ट रिपब्लिकन पार्टीतर्फे शांताराम खुडे,राष्ट्रीय बाल्मिकी सेना पार्टीतर्फे सुनीता छाजछिडक या उमेदवारांनी त्यांच्या पक्षातर्फे अधिकृत उमेदवार म्हणुन अर्ज दाखल केले आहेत. भाजपतर्फे इच्छुक असलेल्या अमर साबळे, राजेश पिल्ले यांनी एक अर्ज पक्षातर्फे तर एक अपक्ष असे दोन अर्ज भरले आहेत. अमित गोरखे यांनी भाजपकडून अर्ज दाखल केला आहे. यापैकी कोणीही पक्षाचा एबी फॉर्म जोडलेला नाही. चंद्रकांत अंबादास माने यांनी काँग्रेसकडून व अपक्ष, प्रतिक झुंबरे यांनी शिवसेना, काँग्रेस आणि अपक्ष असे तीन अर्ज दाखल केले आहेत. गणेश बाळू शिर्के यांनी आरपीआयकडून अर्ज दाखल केला आहे.शैलेंद्र विधाते यांनी काँग्रेस व अपक्ष असे दोन अर्ज दाखल केले. मनसेकडून मिलिंद केरबा सोनवणे यांनी अर्ज दाखल केला. काँग्रेसकडून संदीपान झोंबाडे यांनी अर्ज सादर केला आहे. यांनी कोणीही पक्षांचे एबी फॉर्म जोडलेले नाहित. दशरथ कसबे, राकेश गायकवाड, दत्तात्रय कुचेकर, सुरेंद्र गवळी, शाम घोडके, आशा रणदिवे, शोभा आदियाल, हर्षवर्धन मेश्राम यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.(प्रतिनिधी)