पैसे देण्यास नकार दिल्याने ४ जणांकडून दोघांवर वार; जीवे मारण्याचाही प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 03:12 PM2021-07-25T15:12:02+5:302021-07-25T15:12:19+5:30

कोंढव्यातील स्मशानभूमीमधील पारावर मध्यरात्री बाराच्या सुमारास ही घटना घडली

4 attacked by 4 for refusing to pay; Attempts to kill | पैसे देण्यास नकार दिल्याने ४ जणांकडून दोघांवर वार; जीवे मारण्याचाही प्रयत्न

पैसे देण्यास नकार दिल्याने ४ जणांकडून दोघांवर वार; जीवे मारण्याचाही प्रयत्न

Next

पुणे : खर्चासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने ४ जणांच्या टोळक्याने पालघनने वार करुन तरुणाला जबर जखमी केले. त्याला सोडविण्यासाठी गेलेल्या मित्राच्या डोक्यात वार करुन खुनाचा प्रयत्न केला.

याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी शुभम रामभाऊ टिकोळे (वय २५, रा. कुंजीरवाडा, कोंढवा) याला अटक केली आहे. आकाश उणेचा व त्याच्या दोन मित्रांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना कोंढव्यातील स्मशानभूमीमधील पारावर मध्यरात्री बाराच्या सुमारास घडली. 

याप्रकरणी गणेश शहादेव घुगे (वय २१, रा. कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे. घुगे यांचा मित्र संतोष परदेशी याच्याकडे आकाश उणेचा याने खर्चासाठी पैसे मागितले होते. त्याला परदेशी याने नकार दिला होता. त्याचा राग मनात ठेवून आकाश उणेचा व त्याच्या दोन मित्रांनी संतोष याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. तेव्हा घुगे त्याला सोडवण्यासाठी गेले असताना उणेचा याने पालघनने त्यांच्या डोक्यात वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. संतोष परदेशी यांच्यावरही पालघनने वार करुन जबर जखमी केले. सहायक पोलीस निरीक्षक बर्गे तपास करीत आहेत.

Web Title: 4 attacked by 4 for refusing to pay; Attempts to kill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.