शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
4
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
5
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
6
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
7
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
8
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
9
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
10
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
11
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
12
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
13
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
14
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
15
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
16
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
17
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
18
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
19
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
20
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

डेटींग साईटवरील मैत्री पडली आयटी कंपनीच्या अधिकाऱ्याला महागात; ३७ लाखांना गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2020 20:59 IST

डेटींग अ‍ॅप्स आणि डेटींग साईट्सवरुन तरुणीसोबत झालेली मैत्री...

ठळक मुद्देविमानतळ पोलिसांंनी केला गुन्हा दाखल

 पुणे : डेटींग अ‍ॅप्स आणि डेटींग साईट्सवरुन तरुणीसोबत झालेली मैत्री एका आयटी कंपनीतील बड्या अधिकाºयाला चांगलीच महागात पडली आहे. या तरुणीने त्याला तब्बल ३७ लाख ५४ हजारांना गंडविले असून याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी आठ मोबाईल धारक व २३ बँक खातेधारकांवर माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अभिजीत सुर्यकांत शिवरकर (वय ३२, रा. लोहगाव) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवरकर हे एका सॉफ्टवेअर डाटा अ‍ॅनालॅसिस कंपनीमध्ये वरिष्ठ पदावर काम करतात. मोठ्या पगारावर काम करणाऱ्या शिवरकर यांची एका डेटींग साईटवरुन मार्च २०१९ मध्ये स्टेफनी जॉन्सन नामक तरुणीसोबत ओळख झाली. त्यांच्यामध्ये वारंवार चॅटींगच्या माध्यमातून बोलणे होत होते. तरुणीने त्यांना भारतामध्ये मोठी रक्कम घेऊन येत असल्याचे कळविले होते. त्यानंतर काही दिवसांनी शिवरकर यांना कस्टम आॅफिसर बोलत असल्याचे सांगत एकाने फोन केला होता. स्टेफनी हिच्याजवळ दहा हजार पौंड रक्कम मिळाली असून तिची सुटका करण्यासाठी कस्टम शुल्क भरण्यास सांगितले. त्याने दिलेल्या बॅँक खात्यावर त्यांनी काही रक्कम भरली. त्यानंतर आरोपींनी त्यांना कस्टम चार्जेस, मनी लॉड्रींग सर्टिफिकेट, बँक प्रक्रिया शुल्क, प्राप्तिकर, जीएसटी चार्जेस, डेबिट कार्ड अशी विविध कारणे सांगून २३ बँक खात्यामध्ये तब्बल ३७ लाख ५४ हजार भरावयास भाग पाडले. चार ते पाच महिने सुरु असलेला हा प्रकार थांबण्याचे नाव घेत नव्हता. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार, सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन विमानतळ पोलिसांकडे वर्ग केला आहे. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीPoliceपोलिसrelationshipरिलेशनशिप