शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

मळदला व्हॅनमधील प्रवाशांचे ३ लाख ८० हजार लुटले

By admin | Updated: July 2, 2014 02:22 IST

मळद (ता. दौंड) येथील उड्डाणपूल परिसरात ओमिनी गाडीतील प्रवाशांची लूटमार करून ३ लाख ८० हजारांचा ऐवज लंपास केला असल्याची माहिती ठाणे अंमलदार प्रभाकर बनकर यांनी दिली

दौंड : मळद (ता. दौंड) येथील उड्डाणपूल परिसरात ओमिनी गाडीतील प्रवाशांची लूटमार करून ३ लाख ८० हजारांचा ऐवज लंपास केला असल्याची माहिती ठाणे अंमलदार प्रभाकर बनकर यांनी दिली. सोलापूर येथील काही मंडळी आपल्या नातेवाइकांकडे पुण्याला डोहाळे जेवण करण्यासाठी गेले होते. दरम्यान, रात्री सोलापूर येथे परतीच्या प्रवासाला ओमिनी गाडीतून (क्र. एमएच १३ ए झेड ६७२१) निघाले होते. या वेळी स्कॉर्पिओ गाडी त्यांचा पाठलाग करीत होती. मळद येथील उड्डाणपुलापासून काही अंतरावर रात्री साडेनऊच्या सुमारास ओमिनी गाडीला स्कॉपिओ गाडी आडवी लावण्यात आली. या वेळी स्कॉर्पिओमधील चार अनोळखी चोरटे उतरले आणि प्रवाशांना म्हणाले, ‘आम्ही पोलीस आहोत, तुमच्या गाडीची तपासणी करायची.’ गाडीत दोन पुरुष आणि चार महिला होत्या. तेव्हा चोरटे गाडीजवळ आले. त्यांनी महिलांना धक्काबुकी करून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेतले. तसेच, मदन राऊत यांच्या पाकिटातील ३० हजार रुपये काढले. असा एकूण ३ लाख ८० हजारांचा ऐवज लंपास करून चोरटे भिगवण दिशेला पळून गेले. पळून जाताना ओमिनी गाडीची चावीदेखील चोरटे घेऊन पळाले. घटनेचे वृत्त रावणगाव पोलिसांना कळविण्यात आले. घटनास्थळी ग्रामीण पोलीस अधीक्षक मनोज लोहिया, अतिरिक्त अप्पर पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मोरे, पोलीस निरीक्षक सजन हंकारे आणि पोलिसांनी भेट दिली.(वार्ताहर)