शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

'होम आयसोलेशन'मध्ये राहण्यासाठी २५ हजारांचा 'बॉण्ड'; प्रशासनाचा 'अमरावती पॅटर्न' लागू करण्याचा विचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2021 22:10 IST

रुग्णांचे बिनदिक्कत बाहेर फिरणे रोखण्यासाठी शक्कल 

पुणे : शहरातील हजारो रुग्ण सध्या गृह विलगिकरणात राहून उपचार घेत आहेत. मात्र, काही महाभाग बाधित असतानाही बिनदिक्कत बाहेर फिरत असतात. त्यामुळे इतरांना संसर्ग होण्याची भीती आहे. या रुग्णांचे बाहेर फिरणे।बंद करण्यासाठी पालिकेने शक्कल लढविली आहे. गृह विलगिकरणात राहायचे असल्यास प्रत्येकी २५ हजार रुपयांचा 'बॉण्ड' लिहून द्यावा लागणार आहे. त्यानंतर गृह विलगिकरणात राहता येणार असून या कालावधीत बाहेर पडल्यास २५ हजारांचा दंड वसूल करण्याचा विचार प्रशासनाकडून सुरू आहे. 

शहरातील कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सक्रिय रूग्णांची संख्या ४५ हजारांच्या घरात गेली आहे. यातील ३८ हजार ४०१ रुग्ण गृह विलगिकरणात आहेत. तर,  ६ हजार ४२१ रुग्ण हे रुग्णालयात तसेच काेविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. गृह विलगिकरणात असलेल्या रूग्णांनी काय काळजी घ्यावी याची नियमावली तयार करण्यात आलेली आहे. सोसायट्या, इमारतींमध्ये सध्या कोरोना रुग्ण अधिक आहेत. ज्यांच्या घरात गृह विलगिकरणाची सुविधा आहे, त्यांनाच परवानगी दिली जाते. या रुग्णांवर दररोज संपर्क साधून माहिती घेतली जाते. परंतु, काही रुग्ण कोरोनाला गांभीर्याने न घेता उगाच बाहेर फिरत राहतात. याबाबतच्या तक्रारी पालिका प्रशासनाकडे येत आहेत. त्यामुळे पालिकेने ‘अमरावती पॅटर्न’ लागू करण्याचा विचार सुरू केला आहे.---अमरावती महापालिका गृह विलगिकरणात राहण्याची इच्छा असणाऱ्या रुग्णांकडून पंचवीस हजार रुपयांचे बॉण्ड लिहून घेते. विलगिकरण कालावधीत संबंधित रुग्ण घराबाहेर पडला तर त्याच्याकडून बॉण्डमध्ये लिहिल्याप्रमाणे २५ हजार रुपये वसुल करण्यात येतात. ---बॉण्ड लिहून घेतल्यानंतर विलगिकरण कालावधीत त्यांच्या घरी अचानक भेट देऊन पाहणी केली जाणार आहे. रुग्ण राहत असलेल्या साेसायटीचे अध्यक्ष, सचिव, रुग्णांचे शेजारी यांना याबाबत कल्पना दिली जाणार असून रुग्णांवर कसे लक्ष ठेवायचे याचाही आराखडा तयार केला जात आहे.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याcommissionerआयुक्तPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका